वेस्ट इंडीजच्या यजमानपदात यावर्षीचा १९ वर्षाखालील विश्वचषक १४ जानेवारीपासून सुरू झाला. भारताने शनिवारी (१५ जानेवारी) दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून स्पर्धेतील अभियानाची सुरुवात केली. भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूल (yash dhull) आणि गोलंदाज विकी ओत्सवाल (Vicky Otswal) यांच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर संघाने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. दक्षिण अफ्रिका संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तर त्यांचा फलंदाज डेविल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याची चर्चा सामना संपल्यानंतर देखील होत आहे.
Legacy Continue Of @ABdeVilliers17 #BabyAB pic.twitter.com/ww1netTYrb
— Muawaz Waheed (@Malik_hu_naa) January 16, 2022
भारतीय संघाचा कर्णधार यश धूलने या सामन्यात १०० चेंडूत ८२ धावंची खेळी केली. तर फिरकी गोलंदाज विकी ओत्सवालने टाकलेल्या १० षटकात अवघ्या २८ धावा खर्च करून पाच विकेट्स नावावर केल्या. तसेच वेगवान गोलंदाज राज बावाने टाकलेल्या ६.४ षटकात ४७ धावा खर्च करून चार विकेट्स मिळवल्या. दक्षिण अफ्रिकेसाठी डेविल्ड ब्रेविसने ९९ चेंडूत सर्वाधिक ६५ धावा केल्या, यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. ब्रेविसच्या खेळीला पाहून अनेकांना दिग्गज एबी डिविलियर्स (AB De Villers) याची आठवण आली.
सामन्यात ब्रेविसने असे काही शॉट मारले, जे पाहून चाहत्यांना नक्कीच डिविलयर्सची आठवण आली असावी. ब्रेविसचे अर्धशतक झाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममधील त्याच्या सहकाऱ्यांनी उभे राहून त्याला सन्मान दिला. यावेळी असे काही घडले, ज्या गोष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे.
How I would convince myself that he's not AB de Villiers. pic.twitter.com/UL4jC0yt6v
— Ali Shan Momin (@alishanmomin23) January 16, 2022
ब्रेविसने जेव्हा अर्धशतक पूर्ण केले आणि खेळाडू त्याच्या सन्मानासाठी उभे राहिले, तेव्हा त्याचा एक सहकारी ‘बेबी एबी’ या नावाचे पोस्टर हातात घेऊन उभा राहिला होता. दक्षिण अफ्रिकेच्या १९ वर्षाखीलल संघातील या खेळाडूचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ब्रेविसला त्याच्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये बेबी एबी या नावाने ओळखले जाते. यामगचे कारण आहे, त्याची एबी डिविलियर्सप्रमाणे खेळण्याची शैली. ब्रेविस या सामन्यात ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, ते पाहून दक्षिण अफ्रिकेला त्यांचा नवीन डिविलियर्स लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे,
दरम्यान, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दक्षिण अफ्रिका संघ भारतीय गोलंदाजांपुढे १८७ धावांवर सर्वबाद झाला. ब्रेविसची विकेट राज बावाने घेतली. यश धूलने उत्कृष्ट झेप घेऊन त्याचा झेल पकडला आणि त्याला तंबूचा रस्ता दाखवला. विकी ओत्सवालने घेतलेल्या पाच विकेस्टसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले.
महत्वाच्या बातम्या –
जमशेदपूर-हैदराबादमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस
‘कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाही’
Ashes Trophy| कांगारूंकडून साहेबांना शिकस्त! होबार्ट कसोटीसह ऍशेसवर ४-० ने कब्जा
व्हिडिओ पाहा –