---Advertisement---

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाने केली नवीन पूर्ण वेळ कर्णधाराची घोषणा, तिन्ही क्रिकेट प्रकारात करणार संघाचे नेतृत्व

On: शनिवार, डिसेंबर 9, 2023 10:26 AM
Cricket-Australia
---Advertisement---

मागील महिन्यात 9 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंग हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 21 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्टार क्रिकेटपटू एलिसा हिली हिच्याकडे ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील नेतृत्व सोपवले आहे. तसेच, ताहलिया मॅकग्रा हिला उपकर्णधार बनवले आहे.

ऑस्ट्रेलिया संघ याच महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 21 डिसेंबरपासून होईल, तर दौऱ्याचा अखेरचा सामना 9 जानेवारी रोजी खेळला जाईल. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाईल.

एलिसा हिली (Alyssa Healy) हिने यापूर्वी अनेकदा ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले आहे. तिने इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अलीकडेच खेळल्या गेलेल्या मालिकेत नेतृत्व केले होते. मात्र, आता एलिसा हिली पूर्णवेळ कर्णधार (Alyssa Healy full-time captain) बनली आहे. मागील महिन्यात मेग लॅनिंग (Meg Lanning) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर, तिने ही भूमिका निभावली. तसेच, ताहलिया मॅकग्रालाही नेतृत्वाचा अनुभव आहे. मागील वर्षी जेव्हा हिली उपलब्ध नव्हती, तेव्हा तिने 2 वेळा संघाचे नेतृत्व केले होते.

काय म्हणाली हिली?
कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर हिली म्हणाली, “कर्णधाराची भूमिका स्वीकारून मला सन्मान वाटत आहे. मी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारी आहे. मी वास्तवात मागील काही महिन्यांमध्ये खेळाडूंच्या पाठिंबाचा आनंद घेतला आणि जशी मी सामान्यरीत्या आतमधून जशी आहे, तसेच राहून संघाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या प्रोत्साहनाचा आनंद घेतला आहे. मी स्पष्टरीत्या मेगपेक्षा खूपच वेगळी आहे. मी ती नाहीये, मी एक खूप वेगळ्या शैलीची लीडर आहे. मेग वास्तवात पुढे येऊन नेतृत्व करण्यासाठी आणि सर्वांना आपल्यासोबत घेऊन जाण्यात खूप चांगली आहे. माझा दृष्टिकोनही तोच राहील, जो आधी होता, पण मी भूमिका स्वत:वर सोडेल आणि याची खात्री करेल की, मी या संघासाठी जे यश आम्हाला मिळाले, ते कायम राखण्यासाठी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेल.”

चॅम्पियन हिली
तब्बल 250 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली हिली मागील 14 वर्षांपासून संघाच्या यशाचा आधार राहिली आहे. तिने ऑस्ट्रेलियाला 6 टी20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, 2022मध्ये जेव्हा संघाने वनडे विश्वचषक जिंकला होता, तेव्हाही हिलीने मोलाची भूमिका बजावली होती. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाने राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. हिली त्या संघाचाही भाग होती. (this star cricketer australia name new full time captain ahead of india tour)

हेही वाचा-
विराट-नवीन वादावर गंभीरने पुन्हा काढला राग; आता तर म्हणाला, ‘कुणीही येऊन माझ्या खेळाडूंना…’
दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---