---Advertisement---

बांगलादेशच्या जागी टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ‘या’ संघाची एन्ट्री; बोर्डाने लावली मोहोर

On: शनिवार, जानेवारी 24, 2026 6:19 PM
---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी एक मोठा उलटफेर झाला आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडची एन्ट्री झाली आहे. ‘क्रिकबज’च्या वृत्तानुसार, स्कॉटलंड आता बांगलादेशच्या जागी टी20 वर्ल्ड कप खेळणार आहे. बांगलादेशने भारतात वर्ल्ड कप खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता, ज्यानंतर आयसीसीने (ICC) मोठा निर्णय घेत आगामी स्पर्धेसाठी स्कॉटलंडचा समावेश केला आहे.

आयसीसीने काही दिवसांपूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 24 तासांचा वेळ दिला होता आणि शनिवारी (24 जानेवारी) अखेर हा निर्णय घेण्यात आला. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशला ग्रुप C मध्ये ठेवण्यात आले होते. अशा परिस्थितीत आता तिथे स्कॉटलंडची एन्ट्री झाली आहे. स्कॉटलंड 7 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. स्कॉटलंडचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होईल, तर 9 फेब्रुवारीला हा संघ इटलीविरुद्ध मैदानात उतरेल. याशिवाय 14 फेब्रुवारीला त्यांची लढत इंग्लंडशी होईल. त्यानंतर 17 फेब्रुवारीला स्कॉटलंडचा सामना नेपाळशी होणार आहे.

स्कॉटलंडचे सध्याचे रँकिंग 14 वे आहे. आयसीसी विश्वचषकातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत या संघाला स्थान देण्यात आले आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये स्कॉटलंड ग्रुप बी मध्ये तिसऱ्या स्थानावर होते. त्यावेळी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे गुण समान होते, परंतु रन रेटमुळे स्कॉटलंड पात्र ठरू शकले नव्हते. 2022 मध्ये त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला होता, पण तिसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे ते सुपर 12 साठी पात्र ठरले नव्हते. टी20 विश्वचषक 2026 मध्येही स्कॉटलंडकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---