भारतीय क्रिकेट आणि फुटबॉल संघाचे कर्णधार विराट कोहली आणि सुनिल छेत्री हे दोघे हॉटस्टारच्या एका स्पोर्ट शोमध्ये एकत्र आले होते. जतीन सप्रुने या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आहे.
हे दोन्ही कर्णधार इंडिया स्पोर्ट्स ओनर्स 2 या कार्यक्रमातही एकत्र दिसणार आहे. यामध्ये दोघेही डान्स करणार आहे, असे छेत्रीने सांगितले आहे. हा कार्यक्रम 16 फेब्रुवारीला होणार आहे.
यावेळी छेत्रीने सप्रुला कोहलीचा डान्स बघितला का असा प्रश्न केला होता. तसेच नसेल बघितला तर तो लवकरच इंडिया स्पोर्ट्स ओनर्स या कार्यक्रमात डान्स करणार आहे, असे सांगितले आहे.
“कोणीही हा कार्यक्रम बघण्याचा विसरू नका कारण विराट त्याचा डान्सचा परफॉर्मन्स घेऊन येणार आहे, असे छेत्रीने म्हटले आहे.
कोहली आणि छेत्री या दोघांमध्ये मैत्रीचे चांगले नाते आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. मागे छेत्रीने भारतीय चाहत्यांनी फुटबॉल सामने बघायला यावे अशी विनंती ट्विटवरून केली होती. त्याच्या या पोस्टला कोहलीनेही साथ दिली होती.
सप्रुच्या शोमध्ये कोहली आणि छेत्रीने त्यांच्या खेळाबद्दलही संवाद साधला आहे.
“मी नेहमीच असे स्वप्न बघत असतो ज्यामध्ये मी संघाला अडचणीतून बाहेर काढत आहे. जे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटेल”, असे कोहली म्हणाला.
“मी ही संघ संकटात सापडला असता त्यातून बाहेर पडण्याची कल्पना करतो आणि नंतर ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो”, असे म्हणत छेत्रीनेही कोहलीच्या या विधानाला संमती दर्शवली.
महत्त्वाच्या बातम्या-
–बऱ्याच काळानंतर सचिन तेंडुलकरने केले एमएस धोनीचे असे तोंडभरुन कौतुक!
–किंग कोहलीला ‘तो’ खास विक्रम मोडण्यासाठी हव्या फक्त ६७ धावा