क्रिकेट स्वरूपातील टी-२० क्रिकेट हे चाहत्यांचे सर्वात लोकप्रिय क्रिकेटचे स्वरूप आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या स्वरूपात चाहत्यांना चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. त्यांना रोमांचक सामना पाहायला मिळतो. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज फलंदाज आहेत, त्यातील अनेक भारतीय फलंदाजांनीही बऱ्याच धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये सातत्य राखून धावा करणे हे फलंदाजासाठी खूप अवघड आहे. कारण या स्वरुपात खेळाडूला वेगवान खेळ करावा लागतो. जलद खेळ केल्याने फलंदाज लवकर बाद होण्याची शक्यता असते.
वनडे क्रिकेटमध्ये जसे १० हजार धावा केल्या असतील तर त्याला एक महान फलंदाज म्हटले जाते. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाने ५ हजार धावा केल्या असतील तर तो या प्रकारातील सर्वात मोठा खेळाडू मानला जाईल. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत जगातील कोणताही फलंदाज ५ हजार धावा करू शकला नाही, परंतु असे २ भारतीय फलंदाज आहेत जे ही कामगिरी करु शकतात.
या लेखात त्या २ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट ५ हजार धावा करू शकतात. हे दोन फलंदाज सध्या ज्या पद्धतीने खेळत आहेत ते पाहता हे दोन्ही फलंदाज लवकरच ५ हजार धावांचा टप्पा गाठू शकतात.
टी-२० मध्ये ५ हजार धावांच्या टप्यापर्यंत पोहोचणार हे २ भारतीय फलंदाज
२. रोहित शर्मा (Rohit Sharma)
‘हिटमॅन’ रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या तिन्हीही प्रकारात जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी जबरदस्त होत आहे. रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०८ सामन्यात ४ शतके आणि २१ अर्धशतकांच्या मदतीने २७७३ धावा केल्या आहेत. जर तो पुढील ५ वर्ष नियमित टी-२० सामने खेळाला तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण करू शकतो.
१. विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. ‘रनमशीन’ विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८२ सामन्यांच्या ७६ डावांमध्ये ५०.८० च्या जबरदस्त सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत. यात तो २१ वेळा नाबाद राहिला आहे. त्याचा स्ट्राइक रेट १३८.२४ आहे.
विराट कोहलीने ७६ डावात २४ अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद ९४ धावा आहे. जर तो आणखी काही वर्षे खेळाला तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो नक्कीच ५ हजार धावा करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रैना-हरभजन आयपीएलमधून बाहेर पडले म्हणून काय झालं, थाला आहे ना’
कसोटीत त्रिशतक ठोकलेला खेळाडू म्हणतो, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच मला…
आयपीएल २०२० बाबत विराट कोहली म्हणतो, मला २०१६ सारखं…
ट्रेंडिंग लेख –
जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
असे ३ प्रसंग; जेव्हा एखाद्या क्रिकेटरची दुखापत ठरते दुसऱ्याच खेळाडूसाठी वरदान