भारतीय क्रिकेटसाठी रविवार (दि. 11 जून) हा खराब दिवस ठरला. या दिवशी भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता बनण्याच्या मार्गात ऑस्ट्रेलियाने खोडा घातला. भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलिया संघाने नववा आयसीसी किताब आपल्या नावावर केला. अशात भारतीय संघाच्या 2 खेळाडूंवर चाहत्यांनी चांगलीच आगपाखड केली. कोण आहेत ते दोन खेळाडू? चला जाणून घेऊयात…
भारताचा लाजीरवाणा पराभव
लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव 296 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 विकेट्स गमावत 270 धावांवर घोषित केला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावातही 234 धावांवर संपुष्टात आला. यामुळे भारताने हा सामना 209 धावांच्या मोठ्या अंतराने गमावला. त्यानंतर 2 खेळाडूंवर चाहत्यांना चांगलीच आगपाखड केली.
Why BCCI is selecting KS Bharat and Umesh Yadav for Test match?
— Gautam Kumar (@Gautamjais) June 9, 2023
उमेश यादव
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला 57 कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. मात्र, तो डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात खास कामगिरी करू शकला नाही. दोन्ही डावात त्याला फक्त 2 विकेट्सच घेता आल्या. पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने पाच गोलंंदाजांना उतरवले, पण एकमेव उमेशला विकेट घेता आली नाही. त्याने पहिल्या डावात 23 षटके गोलंदाजी करत 77 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात उमेशने 17 षटके गोलंदाजी करत 54 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी उमेशविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या
I believe Umesh Yadav and KS Bharat just played their last test match #WTCFinal2023
— Sanket Modi (@SanketThinks) June 10, 2023
Hopefully the last test for Umesh Yadav, KS Bharat and Rohit Sharma. #INDvAUS
— Sam Nathan (@tweet2days) June 9, 2023
केएस भरत
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशसाठी खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हा रिषभ पंत याच्या अनुपस्थितीत संघाकडून खेळत होता. मात्र, त्याच्यावर खूप जबाबदारी होती. कारकीर्दीतील 5वा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरलेला भरत फलंदाजीत एकदम फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात 15 चेंडूंचा सामना करताना फक्त 5 धावा केल्या. त्यावेळी स्कॉट बोलँड (Scott Boland) याने भरतचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या डावातही भरत सातव्या स्थानी फलंदाजीला उतरला आणि 23 धावा करून तंबूत परतला. यावेळी त्याने 41 चेंडूंचा सामना करत 2 चौकार मारले. निश्चितच भरतने बॅटमधून चांगले योगदान दिले असते, तर भारताचे पारडे जड पडू शकले असते, पण तसे घडले नाही. यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर चांगलीच आगपाखड केली. (this two indian cricket team player canker fans raised demand for immediate ouster know about them)
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलचा पराभव विराटच्या जिव्हारी, एक शब्दही न बोलण्याचा घेतला निर्णय; स्टोरी पाहून व्हाल भावूक
भारतीय फलंदाजांवर कडाडले सुनील गावसकर; म्हणाले, ‘मोठ्या खेळीविषयी बोलणाऱ्या विराटला प्रश्न विचारा…’