---Advertisement---

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत रोहितसमोर संघनिवडीचा पेच? हे आहेत पर्याय

On: मंगळवार, मार्च 1, 2022 11:38 AM
rohit-sharma-test
---Advertisement---

रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. आता या दोन संघांमध्ये ४ मार्चपासून मोहाली येथे कसोटी मालिका(IND vs SL Test series) सुरु होणार आहे. या मालिकेत संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे. रोहित शर्माचा हा कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना असणार आहे. माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat kohlis 100th test match) हा १०० वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यात भारताचे भवितव्य देखील ठरणार आहे कारण, या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे यांचा समावेश नसेल.

भारताला यावर्षी फक्त तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी दोन सामने याच मालिकेत होतील. तर एक सामना इंग्लंडमध्ये होईल. तीनही सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणेजे संघात परतणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता ज्यांना संधी दिली जाईल तेच भविष्यात कसोटी संघाचा पाया रचणार आहेत.

मोहालीमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल सलामीला येवू शकतो. तसेच शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर, विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर आणि हनुमा विहारीला सहाव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. शुबमन गिलने ऑस्ट्रेलियात सलामी दिली होती, परंतु आता केएल राहुल संघात नसल्याने फक्त मयंक अग्रवाल कसोटीत सलामीला येवू शकतो. शुबमनला टाॅप ऑर्डरमध्ये ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापन बोलले होते.

माजी निवडकर्ते देवांग गांधी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, शुबमन गिल कसोटीत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असेल. जो भविष्यात मोठा फलंदाज बनू शकतो. गिलने ऑस्ट्रेलियात मालिकेत पदार्पण केले तेव्हा देवांग गांधी निवडसमिती सदस्य होते.

भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी रिषभ पंतला मैदानात पाठवू शकतो. विराटनंतर पंत फलंदाजीला येईल आणि शेवटी हनुमा विहारी डाव सांभाळण्यासाठी उपस्थित असेल. पंतने अलिकडच्या काळात कसोटीत चांगली कामगिरी केलाी आहे. त्यामुळे त्याचा संघाला फायदा होऊ शकतो. परंतु श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकेल की नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियंक पंचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

महत्वाच्या बातम्या-

सचिनसोबत पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर (mahasports.in)

शास्त्री गुरुजींचे आधी साहाला समर्थन, आता म्हणतायेत… (mahasports.in)

आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---