आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या दिसणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले होते. कारण रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून दूर करत त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयामुळे आयपीएलचा 16 वर्षांचा इतिहास बदलला जाणार आहे.
याबरोबरच, आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा लिलाव डिसेंबर महिन्यात पार पडला होता. त्याआधी ट्रेडिंग विन्डोमध्ये हार्दिक पंड्या याला मुंबईने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं. त्यानंतर काही दिवसातच मुंबई इंडियन्सने पंड्याला कर्णधारपद देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या निर्य़णावर मुंबईचे चाहते चांगलेच संतापले होते.
आत्तापर्यत आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली पाचवेळा विजेतेपद जिंकल आहे. मात्र या हंगामात रोहित खेळत असतानाही त्याचा आता फक्त खेळाडू म्हणून संघात समावेश असणार आहे. याबरोबरच आयपीएलच्या इतिहासात रोहित पूर्णवेळ कॅप्टन असताना खेळाडू म्हणून खेळणार आहे.
दरम्यान, आयपीएल 2008 च्या पहिल्या पर्वामध्ये एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून तो सीएसके संघाचं कर्णधारपद पाहत होता. 2017 साली टीम इंडियाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला. धोनीनंतर विराट कोहली टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. तोसुद्धा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळला होता.
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 साठी:- रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस. हार्दिक पांड्या (C), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
- WPL 2024 : तिसरा कोण? गुजरात जायंट्सने टॉस जिंकूण घेतली फलंदाजी, पाहा प्लेइंग 11
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पुन्हा येणार टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने?