वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात युपी वॉरियर्स विरूद्ध गुजरात जायंट्सचा संघ आमने सामने येणार आहेत. तर या सामन्यात ने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. तर बाद फेरीत टॉप 3 संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
याबरोबरच, तिसऱ्या संघासाठी युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. तसेच आज वुमन्स प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्सचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना आहे. यामुळे युपी वॉरियर्स संघासाठी हा सामना प्लेऑफच्या नजरेने करो या मरो असणार आहे.
दरम्यान, गुजराज जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात आज सामना होत आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना गुजरातने जिंकला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास सोपा होईल. नाही तर कठीण आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरुने 7 सामन्यात 3 विजय आणि 4 पराभवांसह एकूण 6 गुण मिळवले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
युपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेट किपर आणि कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकोर, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवाणी.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी(विकेट किपर आणि कर्णधार), फोबी लिचफिल्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम मो. शकील.
महत्त्वाच्या बातम्या-
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पुन्हा येणार टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने?
- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 च्या प्रमोशन फेरीसाठी ‘अ’ गटातील 4 संघ पात्र