जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा 2021-23 हंगाम रविवारी (11 जून) संपला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर भारतीय संघ जवळपास पुढचा एक महिना विश्रांतीवर असणार आहे. जुलै महिन्यात भारताला वेस्ट इंडीज दौरा करायचा आहे. तत्पूर्वी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. युवा यशस्वी जयस्वालसाठी ही बातमी आनंदाची म्हणता येईल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका लांबणीवर टाकल्यामुळे रोहितसेनेला एक महिन्यांची विश्रांती मिळाली आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर सर्व खेळाडू आता पुढचा एक महिना विश्रांतीवर आहेत. पण असे असले तरी, कर्णधार रोहित शर्मा () याला वेस्ट इंडीजिरुद्धच्या मालिकेत देखील विश्रांती मिळणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारताला एकूण 10 सामने खेळायचे आहेत. यात दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. माहितीनुसार आयपीएल 2023मध्ये आपल्या फलंदाजीचे धुमाकूळ घातलेल्या यशस्वी जयस्वाल () याला या तिन्ही मालिकांसाठी संघात सामील केले जाऊ शकते.
भारताचा हा वेस्ट इंडीज दौरा जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने चारणार आहे. दौऱ्याची सुरुवात 12 जुलै रोजी कसोटी मालिकेने होईल, त्यानंतर वनडे आणि शेवटची टी-20 मालिका खेळली जाईल. माध्यमांतील वृत्तांनुसार विराट कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना वेस्ट इंडीडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. अशात शुबमन गिल याच्या साधीने यशस्वी जयस्वाल भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो.
जयस्वाल शक्यतो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असतो. पण सलामीला खेळण्याचा अनुभव देखील युवा फलंदाजाकडे आहे. जयस्वालने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 14 सामन्यात 625 धावा केल्या होत्या. ही हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जयस्वालने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1845 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 265 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. यादरम्यान 80 धावांची सरासरी राखत त्याने 9 शतकेही केली आहेत. (‘This’ young opener will replace Rohit! A chance to get a chance in the playing eleven during the West Indies tour)
महत्वाच्या बातम्या –
मराठमोळ्या श्रेयांकाची अभिमानास्पद कामगिरी, फक्त 2 धावा खर्चून हाँगकाँगचा अर्धा संघ पाठवला तंबूत
बिग ब्रेकिंग! महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, एका क्लिकवर वाचा सर्व माहिती