श्रीलंकेमध्ये सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड आयोजिक मेजर क्लब्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत खेळताना थिसेरा परेराने मोठा पराक्रम केला आहे. त्याने रविवारी (२८ मार्च) आर्मी स्पोट्स क्रिकेट क्लबकडून खेळताना एका षटकात सलग ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने काही विक्रमही केले आहेत.
तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार मारणारा पहिला श्रीलंकाई क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच श्रीलंकेतील मेजर क्लब्स स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा क्रिकेटपटू आहे. त्याने रविवारी ६ सलग षटकार मारण्यासह १३ चेंडूत नाबाद ५२ धावा देखील केल्या. या यादीत अव्वल क्रमांकावर कौशल्य विररत्ने आहे. त्याने २००५ साली १२ चेंडूत अर्धशतक केले होते.
रविवारी आर्मी स्पोट्स क्लब विरुद्ध ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि ऍथलेटिक क्लब यांच्यात सामना झाला. पावसामुळे हा सामना सुरुवातीला प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासा आर्मी स्पोट्स संघाकडून कर्णधार परेरा डाव संपण्यास २० चेंडू बाकी असताना ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यानंतर धिल्हन कुरेने टाकलेल्या एका षटकार त्याने सलग ६ षटकार मारण्याचा कारनामा केला.
त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे ब्लूमफिल्ड समोर आर्मी स्पोट्स क्लबने ३१८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना ब्लूमफिल्ड संघ जेव्हा ६ बाद ७३ धावांवर होता, तेव्हा पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला.
परेराचा दिग्गजांच्या यादीत समावेश
परेरा यावर्षी ६ चेंडूत ६ षटकार मारणारा दुसरा क्रिकेटपटू आहे. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजचा टी२० कर्णधार कायरन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ६ षटकार मारले होते.
तसेच व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकाच षटकात ६ षटकार मारणारा परेरा हा एकूण ९ वा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सर गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, रॉस व्हाईटली, हझरतुल्लाह झझाई, लिओ कार्टर आणि कायरन पोलार्ड यांनी असा कारनामा केला आहे. यातील गिब्स, युवराज आणि पोलार्ड या तिघांनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडू षटकार मारण्यात आले आहे. अन्य ६ जणांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा कारनामा केला आहे.
तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार मारण्याचा कारनामा करणारा परेरा गिब्सनंतरचा दुसराच क्रिकेटपटू आहे. गिब्सने २००७ सालच्या वनडे विश्वचषकात एकाच चेंडूत ६ षटकार मारले होते.
व्यावसायिक क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकार मारणारे क्रिकेटपटू –
१९६८ – गॅरी सोबर्स (प्रथम श्रेणी सामना)
१९८५ – रवी शास्त्री (प्रथम श्रेणी सामना)
२००७ – हर्षल गिब्स (वनडे)
२००७ – युवराज सिंग (आंतरराष्ट्रीय टी२०)
२०१७ – रॉस व्हाईटली (टी२०)
२०१८ – हझरतुल्लाह झझाई (टी२०)
२०२० – लिओ कार्टर (टी२०)
२०२१ – कायरन पोलार्ड (आंतरराष्ट्रीय टी२०)
२०२१ – थिसरा परेरा (अ दर्जाचा सामना)
महत्त्वाच्या बातम्या –
सॅम करनच्या खेळीत एमएस धोनीची झलक दिसली, पाहा कुणी केलंय हे विधान
पराभूत होऊनही इंग्लंड वर्ल्डकप सुपर लीगच्या अव्वलस्थानी कायम, तर भारतीय संघ ‘या’ क्रमांकावर
चाहता नंबर १! नेट गोलंदाजाने पाया पडत घेतले ‘माही’चे आशिर्वाद; पाहा तो नजरेत भरणारा क्षण






