---Advertisement---

Thomas Cup 2026: लक्ष्य सेनविना खेळलेल्या भारताचा स्वप्नभंग! सेमीफायनलमध्ये फ्रान्सकडून पराभूत होत कांस्य पदकावर मानावे लागले समाधान

On: रविवार, मे 3, 2026 11:23 AM
---Advertisement---

शनिवारी (२ मे) डेन्मार्कच्या हॉर्सेन्समध्ये झालेल्या थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारतीय पुरूष बॅडमिंटन संघ फ्रान्सकडून ०-३ असा पराभूत झाला. त्यामुळे भारताच्या पदरी निराशा आली आणि संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी भारताला लक्ष्य सेनची अनुपस्थिती खूपच महागात पडली. २०२२ च्या सुवर्णपदकानंतर भारतीय संघाचे हे या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे पदक आहे.

पॅरिस २०२४ च्या उपांत्य फेरीतील खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यला शुक्रवारी (१ मे) चायनीज तैपेईविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात कोपराची दुखापत झाली होती. त्यामुळे तो उपांत्य सामन्याला मुकला. त्याच्या अनुपस्थितीत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या ख्रिस्तो पोपोव्ह विरुद्ध सामन्याची सुरूवात केली. त्याला मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

आयुषने उपांत्यपूर्व फेरीत ऑल इंग्लंड चॅम्पियन लिन चुन यी याला पराभवाचा धक्का दिला होता, मात्र फ्रेंच प्रतिस्पर्ध्यासमोर त्याचे एक चालले नाही आणि दोन्ही गेम पूर्णपणे गमावले. ३९ मिनिटे चाललेला हा सामना आयुषने २१-११, २१-९ असा गमावला.

दुसऱ्या सामन्यात माजी जागतिक क्रमांक एक किदाम्बी श्रीकांतने १० व्या क्रमांकाच्या ऍलेक्स लॅनिएर विरुद्ध चांगली झुंज दिली, मात्र ४१ मिनिटे चाललेल्या या सामन्यात त्याला २१-१६, २१-१८ असा पराभव पत्कारावा लागला आणि भारता २-० ने मागे पडला. तिसऱ्या सामन्यातही भारताच्या हाती पराभवाच लागला. स्पर्धेतून बाहेर पडण्यापासून केवळ एक पराभव दूर असताना एचएस प्रणॉयने पहिल्या गेममध्ये कडवी झुंज दिली. शेवटी हाती निराशाच आली. हा सामना त्याने २१-१९, २१-१६ असा गमावला. दुहेरीचे दोन सामना बाकी असतानाच फ्रान्सने उपांत्य फेरी जिंकली.

पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला सं, थॉमस कपच्या समांतर सुरू असलेल्या उबर कप २०२६ मध्ये गट फेरीच्या पुढे जाण्यात अपयशी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---