कोणत्याही खेळाडूसाठी स्वतःच्या राष्ट्रीय संघासाठी नेतृत्व करणे, ही गोष्ट सोपी नसते. संघाचे नेतृत्व करताना त्या खेळाडूला संघाचे आणि सोबतच स्वतःचे प्रदर्शन चांगले राखणे गरजेचे असते. अशात प्रत्येक खेळाडू या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकेलचं असे नाही. अनेकदा खेळाडूंनी कामाच्या ताणामुळे संघाचे कर्णधारपद सोडल्याचे पाहिले गेले आहे. विराट कोहली (vrat kohli) सोबत देखील असे झाले असावे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर विराट कोहलीने दुसऱ्याच दिवशी कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिली. पण यामुळे त्याच्या कारकिर्दीवर काही परिणाम पडेल अशी अजिबात शक्यता नाही. याउलट झाला तर त्याला या निर्णयाचा त्याला फायदाच होऊ शकतो. आता तो त्याच्या फलंदाजीवर जास्त लक्ष देऊ शकतो. यापूर्वी अनेक खेळाडूंची संघाचे कर्णधारपद सोडले आहे आणि त्यानंतर त्यांची कारकीर्द अधिक मोठी झाली. आपण या लेखात अशाच पाच भारतीय खेळाडूंचा विचार करणार आहोत, ज्यांची कारकीर्द संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर अधिक लांबली.
‘या’ पाच भारतीय दिग्गजांच्या कारकिर्दीवर कर्णधारपद सोडल्याचा काहीच परिणाम झाला नाही
१. सचिन तेंडुलकर
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याला १९९६ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली होती. परंतु १९९९ विश्वचषकापूर्वी त्याने एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून माघार घेतली. तसेच, २००० मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व देखील सोडले. सचिनला ही भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडता येत नसल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. कर्णधारपद सोडल्यानंतर मात्र त्याच्या प्रदर्शनात जबरदस्त सुधारणा झाली. यानंतर त्याने अनेक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर केले. कर्णधारपद सोडल्यानंतर तब्बल १३ वर्ष तो संघासोबत खेळत राहिला. २०१३ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
२. कपिल देव
कपिल देव (Kapil Dev) भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार आहेत. १९८३ विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. विश्वचषक स्पर्धेच्या ठीक आधी त्यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले गेले होते. त्यानंतर १९९४ पर्यंत त्यांना भारतीय संघासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तब्बल सात वर्षांपूर्वी त्यांना संघाचे कर्णधारपद सोडले होते.
३. राहुल द्रविड
राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचा दिग्गज कसोटी फलंदाज होता. त्याने संघासाठी एकप्रकारे संरक्षक भिंतीचे काम केले. २००५ मध्ये राहुलकडे संघाचे कर्णधारपद आले होते. त्यानंतर २००७ मध्ये विश्वचषक स्पर्धेत जेव्हा भारतीय संघ पहिल्या फेरीतून बाहेर पडला. त्यानंतर राहुलने संघाचे कर्णधारपद सोडले. कर्णधारपद सोडले असले, तरी त्यानंतर पुढचे पाच वर्ष ते कसोटी संघात खेळत राहीला आणि २०१२ मध्ये निवृत्ती घेतली.
४. सौरव गांगुली
सौरव गांगुली (saurav ganguly) याने २००० साली पहिल्यांदा संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वातील भारतीय संघ २००२ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत संयुक्त विजेता राहिला होता, तसेच २००३ विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. २००५ मध्ये ग्रेग चॅपलसोबत वाद झाल्यानंतर त्याला कर्णधारपदावरून हटवले गेले आणि तो संघातून देखील बाहेर झाला. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले आणि २००८ पर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहिला. कर्णधारपद सोडल्यानंतर तीन वर्षंपर्यंत तो संघात खेळत राहिला.
5. दिलीप वेंगसरकर
दिग्गज दिलीप वेंगसरकर (dilip vengsarkar) यांनी १९८७ मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते आणि १९८९ पर्यंत ही जबाबदारी पार पाडली. कर्णधारपद सोडल्यानंतर पुढच्या तीन वर्षं ते भारतीय संघासोबत खेळत राहिले. ५ फेब्रुवारी १९९२ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्यांचा शेवटचा कसोटी सामना खेळला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार म्हणून विराटने केलेल्या चार ‘अक्षम्य चुका’; ज्याची भारतीय संघाला चुकवावी लागली जबर किंमत
जाता जाता ‘या’ ५ खेळाडूंची कारकीर्द घडवून गेला विराट, एकटा आता घेऊ पाहतोय त्याचीच जागा!
व्हिडिओ पाहा –






