Mohammad Shami Sania Mirza Viral Photo: भारताची माजी टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्यासाठी नवीन वर्ष खूप खडतर ठरत आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याने 20 जानेवारीला तिच्यासोबतचे नाते संपवले. मात्र, अनेक महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता शोएब मलिकने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो उघड करत सानियापासून वेगळे झाल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, सानियाबाबत ट्रोल करणाऱ्यांची मर्यादाही समोर आली आहे.
शोएब मलिक (Shoaib Malik) याच्या तिसऱ्या लग्नावर सानियाची प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने शोएबच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचे नाते संपुष्टात आल्यानंतर सानियाचे नाव मोहम्मद शमी (Mohammad Shami) याच्यासोबत जोडले जाऊ लागले. एवढेच नाही तर शमी आणि सानिया मिर्झा (Sania Mirza) हीचे लग्नाच्या पोशाखात एकत्र फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे मोहम्मद शमीही पत्नीपासून विभक्त झाला आहे. हसीन जहाँबाबत वेळोवेळी बातम्या येत असतात. पण यावेळी मोहम्मद शमीचे सानिया मिर्झासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. 2002 मध्ये शोएबने आयशा सिद्दीकीसोबत लग्न केले होते. यानंतर, 2010 मध्ये त्याचे सानिया मिर्झासोबत अफेअर झाले आणि तिच्याशी लग्न केले. आता 14 वर्षांचे नाते तुटल्यानंतर शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. सना जावेदनेही 2020 मध्ये प्रसिद्ध गायक उमर जसवाल याच्याशी लग्न केले होते. मात्र अवघ्या 3 वर्षानंतर ती पतीपासून विभक्त झाली आहे.
मोहम्मद शमीचे नातेही असेच होते. त्याने 2014 मध्ये केकेआरची चीअर लीडर हसीन जहाँशी लग्न केले. पण लग्नानंतर काही वर्षांनी हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. पण आता दोघेही काही वर्षांपासून वेगळे झाले आहेत. (Those trolling Sania Mirza have crossed the limits this photo with Shami is being made viral)
हेही वाचा
BREAKING: सूर्यकुमार यादवने जिंकला आयसीसी पुरुष ‘टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, दोनदा कोरलं पुरस्कारावर नाव
भारताला विश्व चॅम्पियन बनवणारे शिलेदारच टीम इंडियाला नडणार, ‘या’ देशाकडून खेळणार टी20 विश्वचषक 2024