भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरू असलेला पाचवा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीनंतर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराह याने छोटेखानी पण विस्फोटक खेळी केली. त्यातही त्याने इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला चांगलाच चोप देत कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
यानंतर एक खास योगायोग जुळून आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ज्या फलंदाजांच्या नावावर आहे, ते सर्व फलंदाज आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग राहिले आहेत.
कोणी कोणी केल्या आहेत एका षटकात सर्वाधिक धावा?
आंतरराष्ट्रीय पातळीवर टी२०, वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळले जाते. यातील वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हर्षल गिब्सच्या नावावर आहे. गिब्सने २००७ मध्ये वनडे विश्वचषकातील एका सामन्यात नेदरलँडविरुद्ध हा पराक्रम केला होता. नेंदरलँडचा गोलंदाज डॉन वान बुंगेविरुद्ध एका षटकात सलग ६ षटकार ठोकले होते.
टी२० क्रिकेटमध्ये भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने ही करामत केली होती. त्याने २००७ टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध एका षटकात सलग ६ षटाकारांसह सर्वाधिक ३६ धावा जोडल्या होत्या. कायरल पोलार्डनेही २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध धनंजय डी सिल्वाला एका षटकात ६ षटकार मारत या यादीत आपल्या नावाचा समावेश केला होता.
वनडे आणि टी२० नंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बुमराहने आपल्या नावावर केला आहे. त्याने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात वैयक्तिक २९ धावा मारल्या व त्याला वाईड बॉल व नो बॉलच्या अतिरिक्त ६ धावा मिळाल्या. अशाप्रकारे बुमराहने एका षटकात सर्वाधिक ३५ धावा केल्या. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारे हे चारही खेळाडू आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा भाग राहिले आहेत.
मुंबई इंडियन्सशी आहेत चौघांचे संबंध
वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर असलेला हर्षल गिब्स २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. तर टी२० क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा युवराज सिंगदेखील मुंबई इंडियन्सचा सदस्य राहिलाय. त्याने २०१९ मध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. कायरन पोलार्डही २०१० पासून मुंबई संघाचा भाग आहे. तर बुमराहदेखील मुंबईचे प्रतिनिधित्त्व करतो आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रविंद्र जडेजाने काढला आयपीएलमधील राग? म्हणाला, ‘जे झाले, ते…’
एजबस्टन कसोटीमध्ये विराट बनला मेंटर, कॅप्टन बुमराहला ‘अशी’ केली मदत
तब्बल १९ वर्षे जुना विक्रम मोडल्याने विडींजच्या दिग्गजाने केले बुमराहचे अभिनंदन, ट्वीट करत लिहिले…