टोकियो ऑलिंपिक २०२०मधून मोठी बातमी समोर येत आहे. टोकियो ऑलिंपिकमधील कोरोना प्रकरणांचा आकडा १४८ वर पोहोचला असून सोमवारी (२६ जुलै) आयोजकांनी कोरोनाच्या १६ नवीन प्रकरणांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ३ ऍथलिट्सचाही समावेश असल्याचे समजत आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, तीन ऍथलिट्स, चार काॅंन्ट्रक्टर, आठ खेळाशी संबंधित लोक व एक कर्मचारी हे लोक कोव्हिड पाॅझिटिव्ह सापडल्याचे टोकियो २०२० ऑलिंपिक आयोजकांनी सांगितले आहे. यातील ३ ऍथलिट्स हे ऑलिंपिक गावातील रहिवासी नाहीत. नवीन १६ प्रकरणांची नोद झाल्यानंतर हे उघडकीस आले. (Three athletes among 16 new COVID cases at Tokyo Olympics 2020)
एक खेळाशी संबंधित कर्मचारी आणि एक कंत्राटदार हे नव्याने जोडण्यात आलेले जपानमधील रहिवासी आहेत. तसेच ३ ऍथलिट्स आणि ७ खेळाशी संबंधित कर्मचाऱ्यांना १४ दिवसांच्या कठोर विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
नवीन ८ प्रकरणांच्या समावेशानंतर आतापर्यंत खेळाशी संबंधित कर्मचार्यांची कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची संख्या ही ८३ झाली आहे.
टोकियोला आल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या सदस्यांमध्ये झेक रिपब्लिक, युएसए, चिले, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या देशांतील सहभागी सदस्यांचा समावेश आहे.
यापैकी चार अॅथलिट्सची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बीच-व्हॉलीबॉल आणि रोड सायकलिंग इव्हेंटमधून माघार घेण्यास भाग पाडले. यानंतर झेक रिपब्लिक त्यांच्या पथकाद्वारे संभाव्य आरोग्य सुरक्षा प्रोटोकॉल उल्लंघनाची चौकशी करत आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ