भारतीय संघानं टी20 विश्वचषक 2024 मधील आपली विजयी मोहीम जारी ठेवली आहे. टीम इंडियानं सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताला आता 22 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सुपर 8 चा दुसरा सामना खेळायचा आहे. उभय संघांमधील हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
सध्याचा फॉर्म पाहता, या सामन्यात भारतीय संघाचा बांग्लादेशवर वरचष्मा आहे. मात्र बांग्लादेशच्या टीममध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे भारतीय संघासाठी अडचणीचे ठरू शकतात. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यापासून टीम इंडियाला सावध राहावं लागेल.
रिशाद हुसेन
बांग्लादेशचा युवा प्रतिभावान फिरकी गोलंदाज रिशाद हुसेननं या च्या टी20 विश्वचषकात आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये त्यानं 9 विकेट घेतल्या आहेत. रिशाद भारताविरुद्धही आपल्या फिरकीची जादू दाखवू शकतो. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना त्याच्यापासून सावध राहावं लागेल.
तौहीद हृदोय
तौहीद हृदोय या टी20 विश्वचषकात बांग्लादेशसाठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. त्यानं संघासाठी अनेक सामन्यांमध्ये झटपट खेळी केल्या आहेत. भारताविरुद्ध तो आपल्या स्फोटक फलंदाजीची कमाल दाखवण्यास उत्सुक असेल. अशा स्थितीत त्याला लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्याचा भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न असेल.
शाकिब अल हसन
दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनसाठी हा विश्वचषक आतापर्यंत काही खास राहिला नाही. मात्र, शाकिब हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू मानला जातो, जे त्यानं आपल्या कारकिर्दीत वेळोवेळी सिद्ध केलं आहे. अशा परिस्थितीत भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो बॅट आणि बॉल या दोन्ही विभागात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
बांग्लादेशनं भारताला डिवचलं; सुपर-8 सामन्यापूर्वी शेअर केला 20 वर्षापूर्वीचा व्हिडिओ
टी20 विश्वचषकात रवींद्र जडेजा बनलाय भारतीय संघाची कमजोरी, आकडेवारी धक्कादायक!
140 कोटी भारतीयांना रडवणारा खेळाडू बनला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’, रिकी पाँटिंगच्या हस्ते मिळाली ट्रॉफी