कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी होता. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत देखील भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. भारतीय संघाला या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून पराभूत केले होते.
आता भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. हि मालिका भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणार आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ज्या चुका केल्या होत्या, त्याच चुका जर या मालिकेतही केल्या तर भारतीय संघाचा पराभव निश्चित आहे. (Three biggest mistakes of Indian team in WTC final)
एकाच संघात २ फिरकी गोलंदाजांना संधी देणे
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघात २ फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. आर अश्विन असताना देखील रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले होते. विराट कोहली ही चूक पुन्हा करणार नाही, अशी आशा आहे. अश्विनला संधी दिली तर जडेजाऐवजी संघात प्रमुख फलंदाजाला किंवा गोलंदाजाला खेळवता येऊ शकते.
अनुभवी खेळाडूंवर कमी अवलंबून रहावे लागेल
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय चाहत्यांना आशा होती की भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज धावांचा डोंगर उभारतील. मध्यक्रमात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारखे अनुभवी फलंदाज आहेत. परंतु या मोठ्या सामन्यात दोघेही पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. पुजाराला पहिल्या डावात ८ आणि दुसऱ्या डावात १५ धावा करण्यात यश आले होते. तर अजिंक्य रहाणेला पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात १५ धावा करण्यात यश आले होते. चेतेश्वर पुजाराने निराशाजनक कामगिरी केली असेल तरीही त्याला सतत संधी दिली जात आहे. परंतु या दौऱ्यात त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवणे जिकरीचे ठरू शकते.
चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सिराजला द्यावी संधी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या दौऱ्यावर त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला इंग्लड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत देखील संधी देण्यात आली होती. त्याची चांगली कामगिरी पाहता अनेकांनी अंदाज व्यक्त केला होता की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला संधी देण्यात येईल. परंतू संघातील मुख्य गोलंदाज असताना सिराजला संधी देण्यात आली नव्हती. परंतु आगामी कासोटा मालिकेत विराट कोहलीने सिराजच्या फॉर्मचा फायदा घेतला पाहिजे. त्याच्या धारदार आणि वेगवान गोलंदाजीने तो इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
‘फलंदाजीवर लक्ष दिले असते तर आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला असता,’ अव्वल गोलंदाजाला खंत
ये करके दिखाओ! पठ्ठ्याने गोल फिरत उलट्या हाताने मारला जबराट शॉट, प्रसिद्ध समालोचकही फिदा
‘धोनी’च्या नावाने शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज, ‘तेंडुलकर’ला बनवले वडील; अज्ञात व्यक्ती संकटात!