आयपीएल 2023 चा 12वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईने 8 बाद 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने 18.1 षटकात तीन विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. रविंद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे सीएसकेसाठी मॅछ विनर ठरले. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने सामन्यात केलेल्या काही प्रमुख चुकांमुळे तांना पराभव स्वीकारावा लागला. चल तर जाणून घेऊ मुंबई इंडियन्स संघ कुठे कमी पडला.
चांली सुरुवात मिळूनही मोठी धावसंख्या करता आली नाही
नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. सलामीला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन आले. या दोघांना चार षटकात 38 धावा केल्या आणि संघाला चांगली सुरुवात दिली. पण त्यानंतर मात्र मुंबईच्या फलंदाजांनी सुमार खेळ केला. ईशान किशनसह, सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन आणि तिलक वर्मा स्वस्तात बाद झाले. टिम डेविडने 22 चेंडूत 31 धावा ठोकल्या. अशात संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही.
सीएसकेकडून अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचे प्रदर्शन या सामन्यात जबरदस्त राहिले. सोबतच क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम होते. सीएसकेसाठी फिरकीपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 4 षटकात 20 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच तुषार देशपांडे आणि मिचेल सॅटनर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. सिसांडा मगाला याला एक विकेट मिळाली.
विकेट घेण्यात मुंबईच्या गोलंदाजांना अपयश
मुंबईला या सामन्यात पहिली विकेट लवकरच मिळाली होती. जेनस बेहरनडॉर्फ याने सलामीवीर डेवॉन कॉनवे याला पहिल्याच षटकात बाद केले. पण या विकेटनंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी मोठी भागीदारी केली. रहाणेने अवघ्या 27 चेंडूत 61 धावा कुटल्या. मुंबईच्या गोलंदाजांना मधल्या षटकात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामी रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईला या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले.
(Three main reasons for Mumbai Indians’ defeat against CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाने फक्त कॅच नाही घेतला, अंपायरचा जीव पण वाचवलाय; एक्सप्रेसच्या वेगाने आलेला चेंडू जड्डूने चित्त्याच्या चपळाईने पकडला
सलग दुसऱ्या पराभवानंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंवर भडकला रोहित शर्मा, स्वतः बद्दलही केले मोठे वक्तव्य, वाचा