सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात बांगलादेश संघाने अक्षरशः भारतीय संघाच्या जबड्यातून विजय हिसकावला. अखेरच्या जोडीने नाबाद 54 धावांची भागीदारी करत बांगलादेशला एक गडी राखून विजय मिळवून दिला. एकवेळ विजयाच्या अतिशय जवळ असताना भारतीय संघाला हा पराभव पत्करावा लागला. भारताच्या या पराभवाची काही कारणे देखील आहेत.
1) प्रमुख फलंदाजांचे अपयश-
या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण वरिष्ठ फलंदाजांनी केलेल्या अतातायीपणा ठरले. संघाचा सलामीवीर शिखर धवन 7, कर्णधार रोहित शर्मा 27 व अनुभवी विराट कोहली 9 यांना मोठ्या खेळा करण्यात अपयश आले. पहिल्या तीन क्रमांकावर खेळणाऱ्या या खेळाडूंपैकी एकाने जबाबदारी घेत मोठी खेळी केली असती तर, भारत मोठी धावसंख्या धावफलकावर लावू शकला असता. भारतीय संघ आपल्या डावात केवळ 41.2 षटकात 186 धावा करत सर्वबाद झाला होता.
2) गोलंदाजांच्या अनुभवाची कमतरता-
भारतीय संघाने या सामन्यात चार वेगवान गोलंदाज तर दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. या सर्वांनी आधी टिच्चून गोलंदाजी केली. मात्र, अखेरच्या जोडी विरोधात या गोलंदाजांनी यॉर्कर चेंडूंचा वापर अतिशय कमी केला. तसेच, या गोलंदाजांचे बाऊन्सर तितके घातक नव्हते. तसेच गोलंदाजांकडून काही स्वैर मारा झाला.
3) मोक्याच्या क्षणी ढिसाळ क्षेत्ररक्षण-
भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांपैकी एक मानले जाते. या सामन्यातही भारतीय संघाने चांगले क्षेत्ररक्षण केले. मात्र, अखेरच्या काही षटकांमध्ये केएल राहुलने एक झेल सोडला. तर, वॉशिंग्टन सुंदर याचे झेल घेताना प्रयत्न अपुरे पडले. तसेच भारतीय खेळाडूंनी काही अतिरिक्त धावा देखील क्षेत्ररक्षण करताना दिल्या.
(Three Mistakes Of Team India Against Bangladesh In First ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेरच्या जोडीने टीम इंडियाला लोळवलं! भारतीय संघाचा बांगलादेशविरुद्ध मानहानीकारक पराभव
‘हिंमत असेल तर जिंकूनच दाखवा’; स्टोक्सचे पाकिस्तान संघाला पाकिस्तानातच खुले आव्हान