येत्या २८ ऑगस्ट रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील पहिला सामना खेळणार आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पहिलाच सामना असेल. दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून बंद आहे. आयसीसीच्या स्पर्धेतच या दोन संघांमध्ये सामने होत असतात. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते आशिया चषकात होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला डोकेदुखी ठरू शकणाऱ्या तीन पाकिस्तानी खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम सर्वात मोठा धोका सिद्ध होऊ शकतो. जागतिक टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला बाबर जगातील तिसरा सर्वात यशस्वी टी२० फलंदाज आहे. मागील वर्षी टी२० विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध ६८ धावांची नाबाद खेळी केली होती. सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला बाबर भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकतो.
बाबर सोबतच संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा देखील टी२० क्रिकेटमध्ये नेहमीच दमदार कामगिरी करत आलाय. रिझवान हा मागील दोन वर्षात सर्वाधिक टी२० धावा करणारा फलंदाज आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीत तिसऱ्या काबीज आहे. मागील वर्षाच्या टी२० विश्वचषकाच्या सामन्यात त्यानेच बाबरसह नापास दीड शतकी भागीदारी करत भारतीय संघाला पराभूत करण्याची कामगिरी करून दाखवलेली.
या दोन फलंदाजांव्यतिरिक्त संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा भारतासाठी पुन्हा एकदा त्रासदायक ठरू शकतो. टी२० विश्वचषकात त्यानेच भारताच्या केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली यांना बाद करत भारताच्या पराभवाची पायाभरणी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर सर्वांची नजर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING। भारताशी दोन हात करायला बांग्लादेशचा संघ जाहिर! अनपेक्षित खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा
टीम इंडियाला मिळाला नवा बॅटींग कोच! विश्वचषक मिळवून देणारा पठ्ठ्या देणार भारतीय फलंदाजांना प्रशिक्षण
‘आमच्या खेळाडूंना आयपीएलमुळेच बाकीच्या टी२० लीगमध्ये नो एंट्री’, पाकिस्तानच्या दिग्गजाचा आरोप