---Advertisement---

भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंची टी२० कारकिर्द संपल्यात जमा

On: मंगळवार, मार्च 16, 2021 8:10 PM
---Advertisement---

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे.मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले व त्यांनी त्या संधीचे सोने करत चांगली कामगिरी केली.
त्यामुळे, सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या काही वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन करणे अवघड बनले आहे. आज आपण अशाच पाच अनुभवी खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, जे कदाचित लवकरच टी२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात.

१) अंबाती रायडू
सध्या भारताच्या कोणत्याही संघाचा सदस्य नसलेला हैदराबादचा कर्णधार अंबाती रायडू याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. भारतीय संघाकडे मधल्या फळीत कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत व मनीष पांडे यासारखे खेळाडू असल्याने तो पुन्हा भारतासाठी खेळणे कठीण दिसत आहे. रायडूने यापूर्वीदेखील २०१९ मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला होता.

२) हरभजन सिंग
सध्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सक्रिय असलेला सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून हरभजन सिंगकडे पाहिले जाते. १९९८ मध्ये पदार्पण केलेल्या हरभजनने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी आयपीएलमध्ये सातत्याने खेळत आहे. तसेच, तो समालोचन करताना देखील दिसतो. सध्या भारतीय संघात युजवेंद्र चहल, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर यांसारखे टी२० स्पेशालिस्ट फिरकीपटू असल्याने ४० वर्षीय हरभजनला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.

३) उमेश यादव
सध्या ३३ वर्षाचा असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव हा देखील पुन्हा भारताच्या टी२० संघात खेळेल की नाही, याबाबत शंका आहे. उमेश भारताच्या फक्त कसोटी संघाचा भाग आहे. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा पक्की नाही. आयपीएलमध्ये देखील उमेशची कामगिरी तितकी समाधानकारक नसल्याने, भारताच्या टी२० संघासाठी त्याचा विचार केला जात नाही. आपल्या ११ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तो केवळ ७ टी२० सामने खेळला आहे. सध्या भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराह, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी यासारखे दर्जेदार गोलंदाज आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

कसोटीत जबरदस्त कामगिरी केलेल्या अश्विनने वनडे, टी२०मध्ये संधी मिळत नसल्याबद्दल सोडले मौन; म्हणाला…

Video: १४ वर्षांपूर्वी गिब्सने सलग ६ षटकार मारत रचला होता इतिहास; आजही ‘हा’ विक्रम त्याच्याच नावावर कायम

पूनम राऊतची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, अव्वल २० फलंदाजांमध्ये मिळवले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---