---Advertisement---

दमदार कामगिरीनंतरही ‘या’ तिघांवर झाला अन्याय; कसोटी संघात नाही मिळाली जागा

On: बुधवार, नोव्हेंबर 24, 2021 12:45 AM
---Advertisement---

न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिकेतल्या पहिल्या कसोटी साठी भारताने संघ जाहीर केला. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच दुसऱ्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन करत असल्याने कर्णधारपद तो सांभाळेल. संघात ३ नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कोहलीला पहिल्या कसोटीसाठी आणि सलामी फलंदाज रोहित शर्माला दोन्ही कसोट्यांसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. संघ निवडल्यानंतर काही खेळाडूंना डच्चू दिल्यामुळे बरेच प्रश्न उभे राहिले आहेत. निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केलेल्या असाच तीन खेळाडूंना बाबत आपण जाणून घेणार आहोत.

१. हनुमा विहारी
भारतीय कसोटी संघातला मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीला निवडकर्त्यांनी संघात समाविष्ट केले नाही. विहारीने शेवटची कसोटी जानेवारी मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळली होती. त्यात सिडनीमध्ये हॅमस्ट्रिंग दुखापत होऊन ही तो फलंदाजी करत होता.
आर अश्विन सोबत मिळून झुंजार खेळी खेळताना त्याने भारताला पराभवापासून वाचवले होते. हनुमाने १६१ चेंडूचा सामना करत नाबाद २३ धावा केल्या होत्या. त्याला कसोटी संघात स्थान न दिल्याने अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

२. शार्दुल ठाकूर
भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण हिस्सा असलेला जलदगती गोलंदाज तसेच अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरलादेखील न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत शार्दुल अष्टपैलूची भूमिका बजावत आला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका, आयपीएल व इंग्लंड दौरा या सर्व मालिकांमध्ये त्याने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो टी२० तसेच कसोटी संघाचा देखील भाग नाही.

३. टी नटराजन
अनुभवी जलद गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज आणि नटराजन सारख्या खेळाडूच्या जोरावर भारतीय संघाने हार न मानता कांगारूंना त्यांच्यात घरी हरवले होते. टी नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट गोलंदाजी केलेली. नटराजन नेट गोलंदाजाच्या स्वरूपात दौऱ्यावर गेला होता. मात्र, त्याने या दौऱ्यात वनडे सामन्यात, टी२० आणि कसोटी सामन्यात पदार्पण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीनंतर त्याला संघात संधी देण्यात आली नाही.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), सूर्यकुमार यादव, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---