षटकारांची आतिषबाजी करण्यात सामन्यात: कॅरिबियन खेळाडू अग्रेसर असतात असा समज आहे. मात्र, भारतीय संघातील काही खेळाडूंमध्ये देखील त्यांना कडवी स्पर्धा देण्याची क्षमता आहे. आयपीएल स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडूंनी आपल्या क्षमतेची प्रचिती दिलेली आहे, मात्र सिक्सर किंग ठरण्यासाठी आयपीएल व टी२० क्रिकेट सोबतच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात देखील आपली क्षमता दाखवणे गरजेचे असते. २०२० वर्षात कोरोनामुळे भारतीय संघ केवळ ९ वनडे सामने खेळू शकला. मात्र, या ९ सामन्यांमध्ये देखील भारतीय खेळाडूंनी आपल्या आक्रमक खेळाने अनेक अविस्मरणीय षटकारांची आतिषबाजी केली, तर बघुयात आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात 2020 या वर्षात कोण ठरले आहेत भारताचे सिक्सर किंग.
३. हार्दिक पंड्या (६ षटकार)
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या यादीत क्रमांक ३ वर आहे. दुखापतीमुळे हार्दिक केवळ ऑस्ट्रोलियाविरुद्ध झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतच खेळू शकला होता. मात्र, या ३ सामन्यात पंड्याने आपल्या आक्रमक शैलीची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना करून दिली. या मालिकेत पंड्याने उत्तम फलंदाजी करत ६ षटकार ठोकले.
२. रवींद्र जडेजा (८ षटकार)
रवींद्र जडेजाने मागील १८ महिन्यांत आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. शेवटच्या षटकांत आपल्या आक्रमक फलंदाजीने जडेजाने भारतीय संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांत धावा जमवून दिल्या आहेत. २०२० साली झालेल्या ९ वनडे सामन्यात जडेजाने ८ षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत द्वितीय स्थान मिळवले आहे
१. केएल राहुल (१६ षटकार)
यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रमांक एक वर आहे. राहुलने आपल्या फलंदाजीने क्रिकेट वर्तुळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आक्रमक व बचावात्मक अशा दोन्ही प्रकारे फलंदाजी करू शकणाऱ्या या खेळाडूने ९ वनडे सामन्यांत १६ षटकार मारत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार