---Advertisement---

आयपीएल इतिहासात ५०० चौकार आणि २०० षटकार मारण्याचा विक्रम आहे ‘या’ ३ क्रिकेटपटूंच्या नावावर

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 1:11 AM
---Advertisement---

दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ व्या सामन्यात बुधवारी (२८ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ७ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आणि सुरेश रैनाने खास विक्रम केला आहे.

वॉर्नरचे २०० षटकार
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादकडून वॉर्नरने या सामन्यात मनिष पांडेसह शतकी भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकही झळकावले. त्याने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नरने आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण केले. तो आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करणारा एकूण ८ वा खेळाडू ठरला.

वॉर्नरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १४८ सामन्यात ५४४७ धावा केल्या आहेत. यात त्याने ५२५ चौकार आणि २०१ षटकार मारले आहेत.

रैनाचे ५०० चौकार
हैदराबादने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रैनाने १५ चेंडूत ३ चौकारांसह १७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान रैनाने आयपीएलमध्ये ५०० चौकार पूर्ण केले. तो ५०० चौकार आयपीएलमध्ये मारणारा चौथाच क्रिकेटपटू ठरला. तर शिखर धवन आणि विराट कोहली नंतरचा तिसरा भारतीय ठरला. विशेष म्हणजे शिखने आत्तापर्यंत ६२४ चौकार मारले असून तो ६०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार मारणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.

रैनाने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९९ सामन्यांत ५४८९ धावा केल्या असून यादरम्यान त्याने ५०२ चौकार आणि २०२ षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये ५०० चौकार आणि २०० षटकार मारणारे क्रिकेटपटू
या सामन्यादरम्यान वॉर्नरने २०० षटकार आणि रैनाने ५०० चौकार पूर्ण केल्याने त्यांनी विराटची बरोबरी केली आहे. यासामन्यापूर्वी आयपीएलमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा अधिक चौकार आणि २०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा विराट एकमेव क्रिकेटपटू होता. आता या यादीत वॉर्नर आणि रैनाचाही समावेश झाला आहे. विराटने आयपीएलमध्ये १९८ सामन्यांत ६०४१ धावा केल्या असून ५२१ चौकार आणि २०४ षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे क्रिकेटपटू – 
६२४ – शिखर धवन (१८२ सामने)
५२५ – डेव्हिड वॉर्नर (१४८ सामने)
५२१ – विराट कोहली (१९८ सामने)
५०२ – सुरेश रैना (१९९ सामने)
४९१ – गौतम गंभीर (१५४ सामने)

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 
३५४ – ख्रिस गेल (१३८ सामने)
२४५ – एबी डिविलियर्स (१७५ सामने)
२२२ – रोहित शर्मा (२०५ सामने)
२१७ – एमएस धोनी (२१० सामने)
२०४ – विराट कोहली (१९८ सामने)
२०२ – कायरन पोलार्ड (१६९ सामने)
२०२ – सुरेश रैना (१९९ सामने)
२०१ – डेव्हिड वॉर्नर (१४८ सामने)

महत्त्वाच्या बातम्या –

लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

आयपीएलमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिसने केला ‘तो’ खास विक्रम

आरपी सिंगने सोडला आयपीएलचा बायोबबल, धक्कादायक कारण आले समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---