भारतीय क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्य क्रिकेटमध्ये विजयरथावर आरूढ झाला आहे. युरोपमध्ये आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला वनडे व टी२० मालिका आपल्या नावे केल्या. त्याचबरोबर वेस्ट इंडीजमध्ये भारताच्या द्वितीय श्रेणीतील संघाने यजमान वेस्ट इंडीजला वनडे मालिकेत व्हाईट वॉश दिला. टी२० मालिकेत देखील भारतीय संघ आघाडीवर आहे. असे असले तरी भारतीय संघाला काही आघाड्यांवर अजूनही संकटांचा सामना करावा लागत आहे. भारताच्या अजून अशा काही कमजोरी आहेत, ज्या संघ व्यवस्थापन व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना टी२० विश्वचषकाआधी सोडवाव्या लागतील.
भारतीय संघासमोरील पहिली समस्या-
टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाची सध्याची सर्वात मोठी समस्या आहे नियमित उपकर्णधार केएल राहुलची दुखापत. राहुल आयपीएलनंतर झालेल्या एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेला नाही. तो सध्या पाठीच्या दुखापतीने बेजार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही त्याची निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत तो थेट आशिया चषकात खेळताना दिसू शकतो. सध्या त्याची उणीव भारतीय संघाला तितकी भासत नाही. मात्र, विश्वचषकात त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू संघाला मोठी मदत करू शकतो. त्याला पर्याय म्हणून ईशान किशन व रिषभ पंत हे नवे सलामीवीर बनू शकतात.
भारतीय संघासमोरील दुसरी समस्या-
भारतीय संघाला हार्दिक पंड्यासोबत दुसरा अष्टपैलू म्हणून एका वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या खेळाडूची गरज असेल. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर अशा खेळाडूची मदत होऊ शकते. सध्या दुखापतीतून सावरत असलेला व झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झालेला दीपक चहर ही जबाबदारी पार पाडू शकतो. तसेच दुसरा पर्याय म्हणून शार्दुल ठाकूर यांच्याकडे देखील पाहिले जाऊ शकते.
भारतीय संघासमोरील तिसरी समस्या-
टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. तेथील मैदाने वेगवान गोलंदाजांसाठी पूरक असतात. असे असले तरी, मनगटी स्पिनर म्हणजे लेगस्पिनर तेथे पारंपारिकरित्या चांगली कामगिरी करताना दिसून आले आहेत. सध्या युजवेंद्र चहल हा संघात असणार हे नक्की झाले आहे. मात्र, संघाचा दुसरा स्पिनर कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. रवीचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई व कुलदीप यादव या तिघांपैकी एका जणाची या जागेवर निवड होऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
माजी क्रिकेटरचा भारताच्या संघ निवडकर्त्यालाच दम! म्हणाला, ‘टी२० विश्वचषकासाठी योग्य टीम निवड’
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर