---Advertisement---

धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष

Kuldeep-Yadav
---Advertisement---

भारतीय संघाचा ‘चाइनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने एमएस धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीने अनेक फलंदाजांना आपल्या फिरकीचा जाळ्यात अडकवले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कुलदीप यादवला संघात स्थान मिळवण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. तसेच त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यासोबतच त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी देखील संघात स्थान देण्यात आले नाहीये.

यावरुन कुलदीप यादवची कारकीर्द हळूहळू संपुष्टात येताना दिसून येत आहे. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कुलदीप यादवला संघात संधी न मिळण्यामागची काही प्रमुख कारणे, चला तर पाहूया…

१) भारतीय संघ व्यवस्थापकांनी दाखवलेला अपूर्ण विश्वास : कुलदीप यादवला संघ व्यवस्थापकांमार्फत योग्य वागणूक दिली जात नाहीये. त्याला गेल्या २ वर्षांपासून संघात स्थान दिले जात आहे. परंतु प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जात नाहीये. कसोटी संघात रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संधी दिली जाते. तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहलला स्थान मिळते. परंतु कुलदीपकडे दुर्लक्ष केले जाते. सतत संघात स्थान मिळत नसल्यामुळे कुलदीपच्या विश्वासात घट होत आहे. त्यामुळे तो दिलेल्या प्रसंगी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. अशातच कुलदीप यादवची कारकीर्द संपुष्टात येण्यात संघ व्यवस्थापकांनी देखील मोलाची भूमिका बजावली आहे.

२) यष्टीच्या मागून मिळत नसलेला धोनीचा सपोर्ट : कुलदीप यादव जेव्हा आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. तेव्हा यष्टीच्या मागून एमएस धोनी त्याला मार्गदर्शन करत असे. कुलदीप यादवने आपल्या अनेक वक्तव्यात असेही म्हटले होते की, धोनी यष्टीच्या मागून बोलून त्याला मदत करत असे. कुलदीपला धोनीकडून असा चांगला सल्ला मिळायचा. मग तो धडाडून विकेट्स घ्यायचा. मात्र, २०१९ विश्व चषक स्पर्धेनंतर कुलदीप यादवला धोनी यष्टीच्या मागे सापडला नाही. तेव्हापासूनच कुलदीप यादवची कामगिरी ढासळली. कुलदीप यादवला वर आणण्यात एमएस धोनीने मोलाची भूमिका बजावली होती.

३) आयपीएल संघानेही केले दुर्लक्ष : आयपीएल २०२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने वरून चक्रवर्तीला आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच त्याने मिळालेल्या संधीचे सोने करत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने आयपीएल २०२० स्पर्धेत खेळलेल्या १३ सामन्यात ६.८४ च्या इकॉनॉमीने एकूण १७ गडी बाद केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे कुलदीप यादवला संघात स्थान मिळणे देखील कठीण झाले होते. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाने वरून चक्रवर्तीला संधी दिली होती. त्यामुळे कुलदीप यादवला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. वरुण चक्रवर्तीची कामगिरीही कुलदीपला भारी पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे माजी भारतीय अष्टपैलू हरपला, तब्बल १४८ विकेट्स घेणारे जडेजा कालवश

कोरोनाग्रस्तांसाठी सेहवाग बनला ‘अन्नदाता’; तब्बल ५१ हजार पिडीतांना घरपोच पाठवले मोफत जेवण

WTC फायनलपुर्वी ‘या’ किवी फलंदाजाचा दणका, सलग दुसरे शतक झळकावत टीम इंडियाला दिले आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---