इंडियन प्रीमियर लीग 2024 ला शुक्रवार, 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने असतील. आयपीएल सुरू होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तीन वर्षांची मुलगी सुंदर क्रिकेट शॉट्स खेळताना दिसत आहे. अशा फटक्यांची अपेक्षा तुम्ही या वयाच्या मुलीकडून स्वप्नातही करू शकत नाही!
फीमेल क्रिकेटच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये ही मुलगी एकामागून एक सुंदर फटके मारताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ही तीन वर्षांची मुलगी खूप सुंदर कव्हर ड्राइव्ह खेळते. पुढच्या चेंडूवर ती कव्हर्सला शॉट मारते. व्हिडिओमध्ये मुलगी विविध शॉट्स खेळताना दिसत आहे.
ही मुलगी इतकी लहान आहे की तिनं पॅड म्हणून चक्क एल्बो गार्डचा वापर केला आहे. परंतु तिचे फटके पाहता ती अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळत असल्याचं भासतं. मुलीची बॅट लिफ्ट, बॅट स्विंग आणि फटके मारण्याची पद्धत पाहण्यासारखी आहे. लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये मुलीचं खूप कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, “पायाच्या त्या छोट्या हालचाली आणि ती ज्या पद्धतीनं बॅट स्विंग करत आहे, ते पाहता तिचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे.”
View this post on Instagram
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघानं नुकत्याच संपलेल्या महिला प्रीमियर लीग 2024 चं विजेतेपद पटकावलं होतं. अशी कामगिरी आरसीबीचा पुरुष संघ गेल्या 16 हंगामामध्येही करू शकलेला नाही. आरसीबी महिला संघानं अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत संघाचा 17 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आरसीबीनं 2 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. आरसीबीसाठी कर्णधार स्मृती मानधनानं 39 चेंडूंचा सामना करत 31 धावा केल्या. तर एलिस पेरीनं 37 चेंडूंचा सामना करत नाबाद 35 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“मोहम्मद शमी माझी हत्या करू शकतो”, पत्नी हसीन जहाँचे गंभीर आरोप
कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव