इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. आता अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघादरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातील तिकिटांचे दर समोर आले आहेत.
असे आहेत तिकीटांचे दर
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) अंतिम सामन्यासाठी (IPL final) बीसीसीआयने स्टेडियममधील आसन क्षमतेच्या १०० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यासाठी लाखांपेक्षाही अधिक प्रेक्षक स्टेडियममधून सामना पाहाताना दिसू शकतात. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमची (Narendra Modi Stadium) आसन क्षमता जवळपास १ लाख ३२ हजार आहे.
दरम्यान, माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार अंतिम सामन्याच्या तिकीटांचे दर (IPL Final Tickets Rates) पाहिले, तर ८०० ते ६५,००० रुपयांपर्यंत आहे. सध्या प्राप्त माहितीनुसार अंतिम सामन्यासाठी ८०० रुपयांचे सर्वात कमी दराचे तिकीट आहे, तर ६५,००० रुपयांचे सर्वात जास्त दराचे तिकीट आहे. याशिवाय १५००, २०००, २५००, ३५००, ४५००, ७५००,१४०००, २०००० आणि ५०००० रुपयांची तिकीटेही आहेत. तसेच असे समोर आले आहे की, ६५,००० रुपयांची तिकीटे संपूर्ण विकली गेली आहेत.
आयपीएलमध्ये होणार समारोप समारंभ
यंदा आयपीएलमध्ये समारोप समारंभही पाहायला मिळणार आहे. गेले तीनवर्षे आयपीएलमध्ये समारोप समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता. पण यावेळी समारोप सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या समारोप समारंभात ऑस्कर विजेता संगतीकार आणि गायक एआर रेहमान (AR Rahman) आणि बॉलिवूड स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) परफॉर्म करणार असल्याचेही समजत आहे.
त्याच कारणामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्याची वेळ संध्याकाळी ७.३० वाजताची बदलून रात्री ८.०० वाजता करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
फॉर्म गेल्यानंतरही तोच काळ सर्वात आनंदी असल्याचं म्हणतोय विराट, वाचा कारण
नाबाद ४० धावा चोपणारा मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर झाला असता बाद, पण नशीबाने ‘अशी’ दिली साथ
कोणता असेल तो संघ? गुजरातच्या पराभवाने अन् बंगळुरूच्या विजयाने आयपीएलमध्ये घडणार नवा इतिहास