---Advertisement---

पदार्पणाच्या मालिकेत चमकला तिलक! ‘असा’ पराक्रम करत थेट सूर्याची केली बरोबरी

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 12:17 PM
Tilak varma
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या टी20 मालिकेतील भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले होते. मात्र, तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. भारताने हा सामना 7 विकेट राखून जिंकला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 1-2 अशी गाडी रुळावर आणली आहे. या दरम्यान तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी जबरदस्त फलंदाजी केली. यात तिलकने एक पराक्रम आपल्या नावावर केला आहे.

सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांच्या जबरदस्त फलंदाजीने वेस्ट इंडिजचा संघ विखुरला होता. सूर्या आणि तिलकसमोर वेस्ट इंडिजचे गोलंदाज गारद झाले होते. सूर्याची साथ देत तिलकने महत्वपूर्ण फलंदाजी केली. त्याने नाबाद 37 चेंडूत 49 धावा केल्या. यात 1 षटकारासह 4 चौकारांचा समावेश होता.

तिलकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या पदार्पणातच एक विक्रम केला आहे. युवा खेळाडूने आपल्या पदार्पणात सलग 3 सामन्यात 30 हून धावा अधिक केल्या आहे. असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम फक्त सूर्यकुमारच्या नावावर होता.

तिलक या विक्रमाव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पदार्पणात पहिल्या 3 टी20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सूर्यकुमार सोबत दुसरा खेळाडू ठरला. सूर्यकुमार आणि तिलक यांच्या पहिल्या 3 टी20 सामन्यात साम्य 139 धावा आहेत. या विक्रमात दीपक हुड्डा अव्वल स्थानी आहे. त्याने आपल्या सुरुवातीच्या तिन टी20 सामन्यात 172 धावा केल्या आहेत.

भारतीय संघासाठी टी20 मध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे पहिले तिन फलंदाज
172 धावा – दीपक हुड्डा
139 धावा – सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा
109 धावा – गौतम गंभीर (tilak varma debut record in india vs west indies 2nd t20)

महत्वाच्या बतम्या-  
बिग ब्रेकिंग! विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंडने निवडला वनडे संघ, दिग्गज खेळाडूंचे कमबॅक
जिथे विराट-रोहितला वर्षोनुवर्षे लागली, तिथे ‘या’ पठ्ठ्याने कमी काळात घडवला इतिहास; पाहा कौतुकास्पद कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---