---Advertisement---

इंग्लंडमध्ये तिलक वर्माचे धमाकेदार प्रदर्शन! शतकापासून फक्त 2 धावा दूर

On: मंगळवार, जून 24, 2025 1:20 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत. टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. दरम्यान अनेक भारतीय खेळाडू काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करत आहेत. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर मध्यम फळीतील फलंदाज तिलक वर्मानेही हॅम्पशायरसाठी काउंटी पदार्पणात एक शानदार खेळी केली. तिलक सध्या शतकापासून फक्त 2 धावा दूर आहे.

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात सामना होत आहे. तिलक वर्माने हॅम्पशायरकडून पदार्पण केले. एसेक्स संघाने पहिल्या डावात 296 धावा केल्या. त्या बदल्यात हॅम्पशायर संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा केवळ 34 धावांत 2 विकेट गमावणे ही चूक होती. त्यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने संघाची सूत्रे हाती घेतली आणि भागीदारीला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस हॅम्पशायर संघाने 4 विकेट गमावून 293 धावा केल्या होत्या. 234 चेंडूत 98 धावा काढल्यानंतर तिलक वर्मा सध्याही क्रीजवर आहे. तिलकने त्याच्या डावात 11 चौकार आणि 3 षटकारही मारले.

नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणाऱ्या इशान किशननेही 98 चेंडूत 87 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकारही मारला. भारतीय युवा खेळाडू काउंटीमध्ये चमकत असताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली नाही. शतक झळकावणारे केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया 364 धावांवर आटोपली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---