---Advertisement---

VIDEO: अर्शदीप सिंगवर चिढला तिलक वर्मा! नेमके प्रकरण काय? व्हिडिओ व्हायरल

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 7:38 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या पहिल्या सराव सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत चाहत्यांना आनंदित केले. हा भारताचा सोपा विजय असला तरी ड्रेसिंग रुमचे वातावरण मात्र बिघडलेले दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तिलक शर्मा संघसहकारी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर रागावलेला दिसला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सराव सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडीयमवर खेळला गेला. या सामन्यात भारताचा फलंदाज तिलकने दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन केले. त्याने १९ चेंडूत ४५ धावा केल्या. ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. सामना झाल्यावर ड्रेसिंग रुममध्ये मस्करी सुरू होती.

व्हिडीओमध्ये तिलक काहीतरी खाताना दिसत असून अर्शदीपने अचानक मोबाईल त्याच्याकडे वळवला. तेव्हा अर्शदीप कदाचित रिल शूट करत असावा, त्याने म्हटले, तिलक चांगला नाही दिसत. त्यावर तिलक रागावलेला दिसला असून त्याने अर्शदीपला रेकॉर्डिंग बंद करण्यास सांगितले.

हाच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यामध्ये काहींनी खेळाडूंमध्ये तनाव दिसत आहे, असे वक्तव्य केले असून काहींनी ही केवळ मजा सुरू आहे, असे म्हटले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात अर्शदीपने ४ षटके टाकली. त्याने २९ धावा देत एक विकेट घेतली. तसेच तो भारताच्या २०२४ टी२० विश्वचषक संघाचा भाग राहिला आहे.

टी२० विश्वचषकात भारतीय संघ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मैदानात दिसणार आहे. युएसएविरुद्धचा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यानंतर भारताचे गटातील सामने नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स विरुद्ध आहे.

टी२० विश्वचषक २०२६साठी भारताचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह,अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---