इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबईने आतापर्यंत 5 वेळा किताब आपल्या नावावर केला आहे. एकापेक्षा एक खेळाडूंचा भरणा असलेला मुंबई संघ आयपीएल 2023मध्ये आपल्या पहिल्याच आणि स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रविवारी (दि. 2 एप्रिल) उतरला. या सामन्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर मुंबईपुढे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आव्हान होते. या सामन्यात एकेवेळी 100 धावांच्या आतच मुंबईचा डाव संपुष्टात येईल असे वाटत असतानाच एका फलंदाजाने शानदार फटकेबाजी केली. तसेच, मुंबईला शंभरीच काय तर दीडशतक पार करण्यात मदत केली.
कोण आहे तो खेळाडू?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) संघातील नाणेफेक बेंगलोरने जिंकली होती. यावेळी त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईकडून डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी केली. दोघेही अनुक्रमे 1 आणि 10 अशा वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर कॅमरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव हेदेखील अनुक्रमे 5 आणि 15 धावांवर बाद झाले. यावेळी मुंबईची धावसंख्या 4 बाद 48 इतकी होती. एकेवेळी असे वाटत होते की, मुंबईला 100 धावाही पार करता येणार नाहीत. मात्र, पाचव्या क्रमांकावर 20 वर्षीय तिलक वर्मा (Tilak Varma) फलंदाजीसाठी उतरला.
तिलकने वादळी फलंदाजी करत 45 धावांवर असतानाच मुंबईला 100 धावांचा आकडा पार करण्यात मदत केली. पुढे त्याने अर्धशतकही साकारले. त्याने यावेळी 32 चेंडूत 53 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. यानंतर पुढे त्याने 46 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर त्याने मुंबईला धावफलकावर निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 171 धावांचा आकडा लावण्यात मदत केली.
Match 5. 19.6: Harshal Patel to Tilak Varma 6 runs, Mumbai Indians 171/7 https://t.co/JH4S5n5RWr #TATAIPL #RCBvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
First half-century of the season for @TilakV9 💪
The youngster's looking in sensational touch here in Bengaluru 👌🏻👌🏻
Can he power @mipaltan to a match-winning total❓
Follow the match ▶️ https://t.co/ws391sGhme#TATAIPL | #RCBvMI pic.twitter.com/JLDdRVO2D2
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
तिलकव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. वरची फळी फ्लॉप ठरल्यानंतर सूर्यकुमार यादव हादेखील 15 धावा करून बाद झाला. तसेच, नेहाल वढेरा याने तिलक वर्माला साथ देत 21 धावांचे योगदान दिले. पुढे सातव्या क्रमांकावरील टीम डेविडलाही मोठी खेळी करता आली नाही. तो 4 धावांवर बाद झाला, तर ऋतिक शोकीनने 5 धावांचे योगदान दिले. नवव्या क्रमांकावरील फलंदाज अर्शद खानने नाबाद 15 धावांचे योगदान दिले.
In Tilak we trust ✊
3️⃣rd FIFTY in IPL 💪#OneFamily #RCBvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @TilakV9 pic.twitter.com/7MpEcvHHc4
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2023
तिलकच्या आयपीएल कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आयपीएल 2022 हंगामात 14 सामन्यात फलंदाजी करताना 36.09च्या सरासरीने 397 धावा केल्या होत्या. त्यात 2 अर्धशतकांचाही समावेश होता. आता चालू हंगामात तिलककडून मुंबई संघाला भरपूर अपेक्षा असतील. (Tilak Varma helps mumbai indians to cross 100 runs score against royal challengers bangalore ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 1 धाव करूनही हिटमॅन ‘रेकॉर्ड बुक’मध्ये! सचिननंतर रोहित दुसराच
रोहित शर्माचा भीमपराक्रम! IPL 2023च्या पहिल्या सामन्यात 1 धावेवर बाद होऊनही केला ‘हा’ रेकॉर्ड