मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अपेक्षित प्रदर्शन करत नाहीय. मात्र युवा अष्टपैलू तिलक वर्मा हा त्यांच्यासाठी सकारात्मक बाजू राहिला आहे. तिलकने याच हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आहे आणि फार कमी सामन्यांमध्येच त्याने स्वत:मधील गुणवत्तेला सिद्ध केला आहे. आता याच तिलकने त्याच्या यशामागे कर्णधार रोहित शर्मा याचा हात असल्याचे सांगितले आहे. रोहितने नेहमी त्याला खेळादरम्यान सकारात्मक गोष्टींचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्लीविरुद्ध पदार्पणाच्या वेळी रोहितनेच (Rohit Sharma) तिलकला पदार्पणाची कॅप दिली होती. याबद्दल बोलताना तिलक (Tilak Varma) म्हणाला की, “रोहित भाई नेहमीच माझा आवडता खेळाडू राहिला आहे. त्यामुळे त्याच्याकडून कॅप प्राप्त केल्यामुळे माझा उत्साह वाढला आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास आला. तो नेहमी मला सांगत असतो की, कोणत्याही स्थितीत दबाव घ्यायचा नाही. जसे तुम्ही खेळाचा आनंद घेता आणि खेळता, तसेच नेहमी खेळत राहायचे. तू युवा आहेस आणि खेळाचा आनंद घेण्याची हीच वेळ आहे. जर तू कधी ही गोष्ट गमावली, तर ती पुन्हा मिळत नाही. त्यामुळे तू स्वत:च्या खेळाचा आनंद घेत खेळत राहा, सकारात्मक गोष्टी आपोआप तुझ्याकडे येतील.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
“सध्या मुंबई संघाचा थोड्या कठिण काळातून जात आहे. आम्ही चांगले खेळत आहोत, परंतु छोट-छोट्या चुकांमुळे आम्ही सामना गमावत आहोत. पण रोहितने मला म्हटले आहे की, मी वास्तवात खूप चांगले खेळत आहे आणि मला माझ्या खेळात कसलाही बदल करण्याची गरज नाही. अपयश येत राहाते. परंतु आम्ही पुनरागमन करू,” असेही तिलकने (Tilak Varma Secret Behind His Success) पुढे सांगितले.
“रोहितने नेहमी मला स्वत:च्या खेळाचा आनंद घ्यायला सांगितले. ही गोष्ट मला नेहमीसाठी आठवण राहिल. माझ्या आयुष्यातसाठीही ही गोष्ट माझ्या कामी येईल. मी आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली, ती याचमुळे,” असे शेवटी तिलक म्हणाला.
तिलकने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९ सामने खेळले आहेत. या ९ सामन्यांमध्ये ४३.८६ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने ३०७ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-