Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईच्या विजयानंतरही रोहित आणि प्रशिक्षक जयवर्धने ट्रोल; कारण आहे ‘हा’ खेळाडू

मुंबईच्या विजयानंतरही रोहित आणि प्रशिक्षक जयवर्धने ट्रोल; कारण आहे 'हा' खेळाडू

May 2, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Mahela-Jayawardene-And-Rohit-Sharma

Photo Courtesy: Twitter/mipaltan


आयपीएल २०२२मध्ये अनपेक्षित प्रदर्शन करणाऱ्या मुंबई इंडियन्सला अखेर शनिवारी (३० एप्रिल) सूर गवसला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या या सामन्यात मुंबईला हंगामातील पहिला विजय मिळाला. मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. असे असले, तरीही कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाजी प्रशिक्षक माहेला जयवर्धने मात्र टिकेचे धनी ठरले आहेत.

सिंगापूरचा २६ वर्षीय फलंदाज टिम डेविड (Tim David) शेवटच्या षटकात चांगला खेळला. तसेच, डॅनियल सॅम्सने विजयी षटकार मारत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांच्यावर खडसून टीका केली आहे. मुंबई इंडियन्सने हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये डेविडला खेळण्याची संधी दिली होती. परंतु नंतरच्या सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी दिली गेली नाही.

Tim David saves Mumbai is the only headline I will accept.

— Jarrod Kimber (@ajarrodkimber) April 30, 2022

Biggest positive for Mumbai Indians from this match will be Tim David, such a good player, proved in each & every league. Good to see him coming well in IPL.

— Johns. (@CricCrazyJohns) April 30, 2022

Rohit & his clown management surprised watching Tim David can bat this well eh

— arfan (@Im__Arfan) April 30, 2022

Wonder what made them keep Tim David on the bench this long. Unless it was an injury…idk what to say.

— Kaushik (@CricKaushik_) April 30, 2022

Thats tim david and tight slap to rohit sharma and mahela

— khd sr (@slaychau_) April 30, 2022

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या सामन्यात मुंबईला मिळालेल्या विजयात टिम डेविडचे योगदान महत्वाचे ठरले. मुंबई इंडियन्स त्यांच्या सलग ९व्या पराभवाकडे चालल्याचे दिसत होते, पण डेविडने अंतिम षटकांमध्ये ९ चेंडूत नाबाद २० धावा केल्या आणि सामना जिंकला. मुंबईने पाच विकेट्स आणि ४ चेंडू शिल्लक ठेवून हा विजय मिळवला.  चाहत्यांच्या मते संघातील इतर खेळाडू अपयशी ठरत असताना डेविडला संधी दिली पाहिजे होती, जेणेकरून मुंबईचे प्रदर्शन देखील सुधारू शकत होते. चालू हंगामात मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने टिम डेविडला फक्त तीन सामन्यांत खेळण्याची संधी दिली आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात मुंबईचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले. नेहमी मधल्या फळी खेळणारा सूर्यकुमार या सामन्यात वरच्या फळीत खेळला. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने मुंबईचा डाव सांभाळला आणि मोठी राजस्थान रॉयल्सचे आव्हान पार करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. त्याने ३९ चेंडूत वैयक्तिक ५१ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि २ षटकार निघाले. सूर्यकुमार आणि टिम डेविडच्या खेळीमुळे मुंबईने राजस्थान रॉयल्सकडून मिळालेले १५९ धावांचे लक्ष्य चार चेंडू शिल्लक ठेवून गाठले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

एकच टाकला, पण सॉलिड टाकला! आयपीएल २०२२मधील सर्वात वेगवान चेंडू उमरान मलिकच्या नावावर, पण…

कर्णधार बनताच धोनीने पलटवून टाकला सामना, हाय स्कोरिंग मॅचमध्ये चेन्नईकडून हैदराबादचा १३ धावांनी पराभव

अखेरच्या षटकात लखनऊचा दिल्लीवर ६ धावांनी रोमांचक विजय, मोहसिन खान ठरला विजयाचा हिरो


ADVERTISEMENT
Next Post
Ruturaj-Gaikwad-And-Devon-Conway

ऋतुराज अन् कॉनवेने रचली आयपीएलमधील सर्वात मोठी भागीदारी; सोबत 'हे' शानदार विक्रमही केले नावावर

Prithvi-Shaw

चुकीला माफी नाही! दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूला मोठी शिक्षा, एका क्लिकवर घ्या जाणून

Brian-Lara

पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन...

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.