---Advertisement---

तिलक वर्मा वर्ल्ड कप खेळणार की नाही? प्रशिक्षकांकडून दुखापतीवर मोठा खुलासा समोर!

On: गुरूवार, जानेवारी 8, 2026 8:26 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा (Team india) स्टार फलंदाज तिलक वर्माच्या (Tilak Verma) दुखापतीमुळे भारतीय चाहत्यांची चिंता वाढली होती. तो टी-20 वर्ल्ड कप 2026 पर्यंत फिट होईल की नाही, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, हैदराबाद क्रिकेट टीमचे प्रशिक्षक डीबी रवि तेजा यांनी तिलकच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. तिलक वर्माला ‘टेस्टीक्युलर टॉर्शन’ (Testicular Torsion) या समस्येमुळे अचानक शस्त्रक्रिया करावी लागली होती. 7 जानेवारी रोजी नाश्त्यानंतर त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिलकच्या दुखापतीवर बोलताना प्रशिक्षक रवि तेजा (Ravi Tejaa) म्हणाले की, ही दुखापत तितकी गंभीर नाही. तिलक वर्ल्ड कपला मुकणार असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले, बुधवारी राजकोटमध्ये तिलकवर एक लहान शस्त्रक्रिया करण्यात आली. यात घाबरण्यासारखे काहीच नाही. तिलक पुढच्या 3 ते 4 दिवसांत पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होईल. तो सध्या टीमसोबतच आहे आणि आमच्यासोबतच हैदराबादला परत येईल. मला खात्री आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी तो पूर्णपणे फिट होईल.

प्रशिक्षकांनी सांगितले की, तिलक जम्मू-काश्मीरविरुद्धचा सामना खेळण्यासाठी उत्सुक होता, पण संघ व्यवस्थापनाला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. हैदराबादचे बाद फेरीत (Knockout) पोहोचण्याचे चान्सेस खूप कमी असल्याने तिलकला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला.

हैदराबादने या स्पर्धेत 7 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. तिलकने केवळ 2 सामने खेळले असून त्यात 143 धावा कुटल्या आहेत. या 2 डावांमध्ये त्याने एक शानदार शतकही झळकावले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---