Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहितला पहिल्यांदा भेटल्यावर काय होत्या भावना? तिलक वर्मा म्हणतोय, ‘गळाभेट घ्यायची होती आणि…’

रोहितला पहिल्यांदा भेटल्यावर काय होत्या भावना? तिलक वर्मा म्हणतोय, 'गळाभेट घ्यायची होती आणि...'

May 13, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Tilak-Verma-and-Rohit-Sharma

Photo Courtesy: iplt20.com


इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. पण, १९ वर्षीय क्रिकेटपटू तिलक वर्मा याने मुंबई इंडियन्सकडूनच खेळताना छाप पाडली आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावाही केल्या आहेत. आता त्याने नुकताच खुलासा केला आहे की, जेव्हा तो पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला भेटला, तेव्हा त्याच्या काय भावना होत्या. 

तिलक वर्माने (Tilak Varma) सांगितले की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा रोहित शर्माला (Rohit Sharma) पाहिले होते, तेव्हा माझ्या शरीरावर काटे उभे राहिले. मला त्याची गळाभेट घ्यायची होती आणि त्याचे कौतुक करायचे होते. पण मी जेव्हा त्याला पाहिले, तेव्हा हैराण झालो होतो आणि घाबरलो होतो. त्याचबरोबर मी त्याच्याशी बोलताना घाबरलो होतो.’

तिलक वर्माला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल २०२२ हंगामासाठी (IPL 2022) लिलावातून १.७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण, आता त्याची आयपीएल २०२२ मधील कामगिरी पाहाता त्याला पुढीलवर्षी देखील मुंबई इंडियन्स संघात कायम करण्याची शक्यता आहे.

तसेच पुढे तिलक वर्मा म्हणाला, ‘लिलावाच्या पहिल्या दिवशी मी टीव्हीला चिटकलो होतो. कारण, मी स्क्रिनवर माझे नाव फ्लॅश होण्याची वाट पाहात होतो. नंतर मुंबई इंडियन्सने जेव्हा मला निवडले, तेव्हा हे एक स्वप्न पूर्ण होणारा क्षण होता. मी लहानपणापासून रोहित सरांना पाहात आलो आहे. सचिन सर आणि मुंबई इंडियन्स नेहमीच पुनरागमन करून आणि कोणत्याही परिस्थितीत सामने जिंकण्यास यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मला मुंबई इंडियन्स आवडते.’

देशांतर्गत क्रिकेट हैदराबादकडून खेळणाऱ्या तिलक वर्माने आयपीएल २०२२ हंगामात आत्तापर्यंत १२ सामन्यांत ४०.८९ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याच फलंदाजाला ३५० धावांचा टप्पा आयपीएलच्या १५ व्या हंगामात अद्याप गाठता आलेला नाही. तिलक वर्माने २ अर्धशतकेही झळकावली आहेत.

त्याने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने २५५ धावा केल्या असून ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १६ अ दर्जाचे सामने खेळले असून ७८४ धावा केल्या आहेत आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तिलक वर्माने २७ टी२० सामन्यांत ७४९ धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नईविरुद्ध का खेळला नाही कायरन पोलार्ड? मोठे कारण आले समोर

शर्माची जागा घेणार वर्मा? लवकरच ‘या’ खेळाडूच्या कपाळावर लागणार मुंबईच्या कर्णधारपदाचा ‘तिलक’

द्रविडच्या साधेपणाने पुन्हा जिंकली लाखो मने! बुक स्टोअरमधील फोटो होतोय तुफान व्हायरल


ADVERTISEMENT
Next Post
Babar-Azam

"आम्ही भारताच्या मागे का पळावे?, त्यांना आमच्या विरोधात खेळायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात यावे"

Shloka-Ambani

चमकता चेहरा अन् घायाळ करणारं हसू, जगातील सर्वात श्रीमंत मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद, जाणून घ्या कोण आहे?

CSK

सीएसकेला मुंबई इंडियन्सविरुद्ध का पाहावी लागली हार, 'ही' आहेत ३ कारणे

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.