‘मिस्टर आयपीएल‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैना २०१४मध्ये उप्पलच्या एचसीए स्टेडियमवर हैदराबादचे क्रिकेट प्रशिक्षक सलाम बायश आणि एका १२ वर्षीय मुलाला भेटला होता. चेन्नई सुपर किंग्सला दुसऱ्या दिवशी हैदराबादविरुद्ध सामना खेळायचा होता. यादरम्यान सुरेश रैना १२ वर्षीय तिलक वर्मासोबत ५ मिनिट बोलला आणि त्याच्यासोबत फोटो काढला. या भेटीचा तिलक वर्मावर खूप प्रभाव पडला. ८ वर्षानंतर हा खेळाडू २० वर्षाचा झाल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेली पाहून सुरेश रैनाला (Suresh Raina) नक्कीच आनंद वाटला असेल.
सलाम बायश यांनी तो दिवस आठवत सांगितले की, “माझा एक मित्र स्थानिक मॅनेजर होता. मी सराव पाहण्याच्या स्वीकृतीने त्याची मदत घेतली आणि तिलकला आपल्यासोबत घेतले. मला आठवते की, तिलक सुरेश रैनाला फलंदाजी करताना पाहून खूप प्रभावित झाला. त्याने एक मिनिट सुद्धा रैनावरून नजर हटवली नाही आणि रैनाचा प्रत्येक शाॅट पाहिला. त्यानंतर आम्ही त्याच्यासोबत फोटो काढला आणि मला वाटते की, रैनाची ती विशेष भेट तिलकसाठी तो क्रिकेटपटू बनेल हे ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरली.”
तिलक वर्मा आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. संघाला तिसऱ्या सामन्यात राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला, परंतु या सामन्यात तिलक वर्माने ३३ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तसेच, त्याने दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १५ चेंडूत २२ धावा केल्या. त्याच्या या शानदार खेळीने सर्वांना आकर्षित केले. यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सुद्धा त्याचे कौतुक केले आहे.
तिलक वर्माचे वडील विजेचे काम करतात. त्याचे मत आहे की, त्याला १ कोटी ७० लाख रुपये मिळाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना मदत होईल. तिलक वर्माच्या मते, त्याच्या आई-वडिलांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ आहे. संघाने सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्राॅफी जिंकली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई संघ एक जरी सामना हारला, तर होईल खेळ खल्लास; माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
IPL2022| बेंगलोर वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही