एकीकडे इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असताना, दुसरीकडे इंग्लंडमधील प्रमुख वनडे मालिका असलेल्या रॉयल लंडन स्पर्धेचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये मंगळवारी (१० ऑगस्ट) सरे संघासाठी खेळताना एका फलंदाजाने तुफानी फलंदाजी करत सामन्याचा नूर पालटला. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागला आहे.
या फलंदाजाने आणले वादळ
मंगळवारी सरे विरुद्ध वॉर्विकशायर असा सामना रॉयल लंडन स्पर्धेत खेळला गेला. या सामन्यात सरे संघाचे प्रतिनिधित्व करणारा सिंगापूरचा फलंदाज टीम डेव्हिड याने आपल्या आक्रमक फटकेबाजीने सर्व चाहत्यांचे मनोरंजन केले. डेव्हिड याने केवळ ७० चेंडूत १४० धावांची मॅचविनिंग खेळी केली. डेव्हिडने ५५ चेंडूमध्ये शतक साजरे केले होते. त्याने या खेळीदरम्यान ९ चौकार व ११ षटकारांची आतिषबाजी केली. त्याच्या १४० पैकी १०२ धावा या चौकार व षटकारांनी आलेल्या आहेत. त्याच्या या तुफानी खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
🔥 Tim David was incredible yesterday, here's every boundary in his 140 from 70 balls… ENJOY
2️⃣0️⃣ Boundaries
1️⃣1️⃣ Sixes
9️⃣ Fours pic.twitter.com/O68tGvWThG— Surrey Cricket (@surreycricket) August 11, 2021
असा रंगला सामना
अ गटातील सरे विरुद्ध वार्विकशायर यांच्यात ओव्हल येथे झालेल्या सामन्यात वार्विकशायरचा कर्णधार विल रोड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सर्व फलंदाजांचा थोड्या-थोड्या योगदानाने वार्विकशायरने ९ बाद २६८ पर्यंत मजल मारली. सरेसाठी मॅकर व स्टील यांनी प्रत्येकी चार बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, सरेचे ५९ धावांमध्ये दोन फलंदाज बाद झाले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिडने मैदानाच्या चारी बाजूंना जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार जेमी स्मिथसह १५४ धावांची नाबाद भागीदारी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर पुरस्कार डेव्हिडला देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीला मुकणार अँडरसन? १४ वर्षानंतर घडणार ‘अशी’ घटना
टी२० क्रमवारीत मुस्तफिजुरची ऐतिहासिक मजल, तर शाकिब पुन्हा पोहोचला पहिल्या स्थानी
टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री भारतीय संघाला करणार राम राम; संघात होऊ शकतात मोठे बदल