---Advertisement---

MIvsSRH: पुन्हा एकदा मावळली मुंबईच्या विजयाची आशा! ‘तो’ रनआऊट ठरला टर्निंग पाँईट

Tim-David-Runout
---Advertisement---

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते, कारण इथे एका चेंडूमुळे, एका धावेमुळे किंवा एका झेलमुळे सामना पालटू शकतो. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हंगामातील ६५ वा सामना झाला. मुंबईने हा सामना जिंकण्यासाठी आपले सर्वोत्कृष्ट दिले. तरीही त्यांना फक्त ३ धावांच्या अंतराने हा सामना गमवावा लागला. मुंबईचा इन फॉर्म फलंदाज टीम डेविड याची विकेट हा सामन्याचा कायापालट करणारा क्षण ठरला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने (SRH vs MI) निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. सलामीवीर इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी झाली. रोहित ३६ चेंडूत ४८ धावा करून बाद झाला. तर इशानने ३४ चेंडूत ४३ धावांची शानदार खेळी केली. ही सलामी जोडी पव्हेलियनला परतल्यानंतर मधल्या फळीत तिलक वर्मा आणि डॅनियल सॅम्सला खास योगदान देता आले नाही.

मात्र टीम डेविडने (Tim David) ती कमी भरून काढली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत टीम डेविडने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि १८ चेंडूत ४ षटकार व ३ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची धुव्वादार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबईचा संघ हैदराबादला पराभूत करत त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर करणार असे दिसत होते. तितक्यात सामन्याचे चित्र पालटवणारी (Turning Point Of Match) घटना घडली. 

अठराव्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर टीम डेविडने सलग ३ षटकार ठोकले. त्यानंतर शेवटच्या सहाव्या चेंडूवर एक धाव काढत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या इराद्याने तो धावला. परंतु चेंडू जास्त दूर न गेल्याने गोलंदाज टी नटराजनने पटकन चेंडू पकडला आणि त्याला धावबाद (Tim David Runout) केले. ही विकेट मुंबई संघाला भलतीच महागात पडली. 

टीम डेविड बाद झाल्यानंतर रमनदीप सिंगने ६ चेंडूत नाबाद १४ धावा काढत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे प्रयत्न विफळ ठरले. मुंबईला विजयापासून फक्त ३ धावांनी दूर राहावे लागले. हा मुंबईचा हंगामातील दहावा पराभव होता. त्यांचा पुढील आणइ अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

भारीच! प्रियम गर्गने घेतलेला हवाई कॅच पाहून घालाल तोंडात बोट, Video व्हायरल

IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’

उमरान मलिकने मुंबई इंडियन्सच्या तीन विकेट्स घेत बुमराहला पछाडलं, ‘या’ विक्रमात बनला अव्वल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---