ऑस्ट्रेलियन संघाचे दिग्गज डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट 2018 साली चेंडूशी छेडछाड प्रकरणात चांगलेच अडकले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात या तिघांवर बंदी घातली होती. पण आता ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा माजी कर्णधार टिम पेन याने मोठा खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ही कारवाई केली गेली होती. पण पुढच्याच म्हणजे चौथ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला पेनने चेंडूशी छेडछाड करताना पाहिले.
टिम पेन (Tim Paine) याची आत्मकथा ‘द पेड प्राइस’मध्ये चेंडूशी छेडछाड प्रकरणात काही महत्वाचे खुलासे केले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांत्यात कसोटी मालिका खेळली जात होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कॅमेरून बॅनक्रॉप्ट चेंडूशी छेडछाड करताना पकडला गेला. त्याने चेंडूला स्वीग मिळावण्यासाठी सॅडपेपरचा वापर केला होता. डेविड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव स्मिथ यांना देखील बॅनक्रॉप्टच्या या कृत्यामुळे शिक्षा भोगावी लागली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिघांवर देखील एक-एक वर्षाची बंदी घातली होती. त्यातील वॉर्नरवर कर्णधारपदासाठी अजीवन निर्बंध घातले गेले.
पेनने त्याच्या अत्मकधेत लिहिले की, “मी त्या मालिकेतील चौथ्या कसोटीत असे (चेंडूशी छेडछाड) होताना पाहिले होते. केपटाउमध्ये (तिसरा कसोटी सामना) जे काही झाले, त्यानंतकर होणाऱ्या चर्चा आणि निर्बंधांनंतर देखील. मी या चौथ्या कसोटी सामन्यात नॉनस्ट्राईकवर उभा होतो, जेव्हा एक स्क्रीनवर एक दक्षिण आफ्रिकी खेळाडू चेंडूशी छेडछाड करताना दिसला होता. हा खेळाडू मिड ऑफला उभा होता.”
“कॅमेरून बॅनक्रॉप्टची चूक पकडण्यात सक्रिय भूमिका पार पाडणारे टीवी निर्देशकांनी यावेळी मात्र स्क्रीनवरील चित्र लगेच बदलले. आम्ही या मुद्यावरून पंचांकडेही गेलो होतो, जे थोडे खराब वाटत असेल. पण आम्हाला विश्वास होता आफ्रिकी संघातील खेळाडू पहिल्या कसोटीपासून असे करत आले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे ही फुटेच नंतर मिळाली नाही,” असेही पेनने पुढे लिहिले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या यशाने शास्त्रींचा आनंद गगनात मावेना; म्हणाले, “त्याने आता सर्वांची…”
पाकिस्तानला धूळ चारून भारतीय संघ सिडनीत दाखल, नेदरलंडसोबत खेळायचा आहे पुढचा सामना