आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जूनपासून साऊथॅम्प्टनच्या मैदानावर खेळवला जाईल. तिथे भारतीय संघ कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च्च किताब जिंकण्याकरिता न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करेल. या अंतिम सामन्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवकाश असून क्रिकेटचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट बघत आहेत. दुसऱ्या बाजूला बरेच दिग्गज खेळाडू या अंतिम सामन्याविषयी आपली मत मांडत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने देखील नुकतेच या सामन्याबाबत भाष्य केले. त्याला विश्वास आहे की पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडला हरवून किताब आपल्या नावावर करेल. हे दोन्ही संघ १८ जून पासून साउथटम्पमध्ये एकमेकांना भिडतील. ब्रिस्बेनेमधील एका पत्रकार परिषदेत पेनने सांगितले की, “मला असे वाटते की जर भारतीय संघाने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले तर तो आरामशीर सामना जिंकतील.”
पेनने न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघांविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०१९ मध्ये न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला. तर २०२० मध्ये भारताकडून त्यांना १-२ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
न्यूझीलंड संघाने या अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडला कसोटी मालिकेत १-० ने मात दिली. त्यावर पेनने सांगितले की कोणत्याही प्रमुख खेळाडूंशिवाय उतरलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध मिळवलेला हा विजय निरर्थक आहे. इंग्लडच्या संघात या मालिकेकरिता बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मोईन अली, जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि यष्टीरक्षक बेन फोक्ससारखे स्टार खेळाडू उपलब्ध नव्हते. पेनने सांगितले की, “न्यूझीलंड समतोल संघ आहे, परंतु इंग्लंडचा हा संघ त्यांचा सर्वोत्तम संघ नव्हता. एशेस मालिकेत त्यांचा सर्वोत्तम संघ बघायला मिळेल.”
त्याचवेळी भारतीय संघाने आपले प्रमुख खेळाडू अनुपस्थित असतांना देखील ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच देशात पराभव केला होता. आणि ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे ठेवला होता. बहुधा त्यामुळेच पेनने भारतीय संघ अंतिम सामना जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ‘हे’ विक्रम आहेत फक्त भारतीय संघाच्याच नावावर