---Advertisement---

‘ती’ गोष्ट महागातच पडली आणि WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी गमावली, ऑसी कर्णधाराची व्यथा

On: मंगळवार, जुलै 6, 2021 7:02 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघाने देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. ते देखील अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत शर्यतीत होते. परंतु, त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. याबाबत ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भाष्य केले आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने म्हटले की, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान न मिळवणे कडवट घोटासारखे होते. तसेच स्लो ओव्हर रेटमुळे गुण कमी करताना आयसीसीने थोडे सातत्य दाखवायला हवे होते.”

ऑस्ट्रेलियन संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या यादीत सर्वात पुढे होता. परंतु, भारतीय संघाविरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात स्लो ओवर रेटमुळे त्यांच्या एकूण गुणांमध्ये ४ गुणांची कपात करण्यात आली होती. ही मालिका ऑस्ट्रेलियन संघासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याची शेवटची संधी ठरली. कारण दक्षिण आफ्रिकन दौरा नंतर रद्द करण्यात आला. ज्यामुळे न्यूझीलंड संघाचा फायदा झाला आणि ते थेट अंतिम सामन्यात पोहचले. (Tim paine  says missing out on WTC final bitter pill to swallow)

सामना अधिकाऱ्याने अधिक सातत्य दाखवायला हवे
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध मालिका खेळायची होती. या मालिकेत विजय मिळवत भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. टीम पेनने याबाबत बोलताना म्हटले की, “मी खूप निराश आहे की, स्लो ओव्हर रेटमुळे आम्हाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवता आले नव्हते. मला वाटते की, दुर्देवाने आमचा पहिलाच असा संघ असेल, ज्यांना स्लो ओव्हर रेटचा फटका बसला होता.”

पेनने मागणी केली आहे की, गुण देत असताना सामना अधिकाऱ्याने अधिक सातत्य दाखवायला हवे.

इतर कुठल्याच संघाचे अंक नाही कापले
त्याने म्हटले की, “गेल्या दोन वर्षांत अनेक कसोटी सामने खेळले गेले, ज्यामध्ये अनेक सामन्यांमध्ये ठरलेल्या वेळेनुसार षटके टाकली गेली नाही. यामुळे किती संघांनी गुण गमावले याबाबत मला खात्री नाही. मला वाटते की, अंकांबाबत सातत्य ठेवले गेले पाहिजे. या गोष्टीचे भान असायला हवे की, हा पुरस्कार खूप मोठा आहे. काही षटकांमुळे चार गुण कमी करण्यात येतात.”

महत्वाच्या बातम्या-

‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ

महिलांच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीपूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली ‘ही’ विशेष मागणी

फेडररचा ‘मोठा’ विक्रम! विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा ठरला सर्वात वयस्कर टेनिसपटू 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---