---Advertisement---

एकच विकेट घेतली, पण सॉलिड घेतली; आझमच्या बत्त्या गुल करत साऊदीची टी२०त विकेट्सची ‘सेंच्यूरी’

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 12:34 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ च्या सामन्यात मंगळवारी (२५ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने दिलेले १३५ धावांचे आव्हान पाकिस्तानने १९ व्या षटकात पूर्ण केले. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद करत टीम साऊदीने टी२० क्रिकेटमध्ये आपल्या बळींचे शतक साजरे केले आहे. टी२० क्रिकेटमध्ये बळींची शंभरी गाठणारा तो तिसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी लसीथ मलिंगा आणि बांगलादेशचा शाकीब उल हसन यांनी या आधी हा पराक्रम केला आहे. शाकिब सर्वाधिक ११७ विकेट्ससह अव्वलस्थानी आहे. तर मलिंगाच्या खात्यात १०७ विकेट्स आहेत.

याशिवाय टी२० मध्ये टीम साऊदी १०० विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे तर दुसरा वेगवान गोलंदाज, ज्याने हा टप्पा पार केला आहे.

दरम्यान न्यूझीलंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने पहिल्या ५ षटकात २८ धावा करून एकही विकेट गमावली नव्हती. बाबर आझम (९) सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टिम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर फखर जमान (११) लयीत दिसला नाही. त्याने १७ चेंडूंचा सामना केला. त्याला लेगस्पिनर ईश सोधीने बाद केले. मोहम्मद हाफीजने (११) षटकार ठोकून चांगली सुरुवात केली. पण डेव्हॉन कॉनवेने त्याचा अप्रतिम झेल पकडत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.

सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान ३३ धावा करून बाद झाला. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ५ चौकार मारले. इमाद वसीम बोल्टच्या चेंडूवर ११ धावा काढून बाद झाला. अखेरच्या ५ षटकात संघाला ४४ धावा करायच्या होत्या. १६ व्या षटकात सोधीने अवघ्या ७ धावा दिल्या. १७ व्या षटकात टीम साऊदीने १३ धावा दिल्या. त्याला आसिफने २ षटकार मारले. शेवटच्या तीन षटकात पाकिस्तानला २४ धावा करायच्या होत्या.

शोएब मलिकने नाबाद २६ आणि आसिफ अलीने नाबाद २७ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने १८ व्या षटकात १५ धावा दिल्या. मलिकने या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मलिकने २० चेंडूत २६ तर आसिफने १२ चेंडूत २७ धावा केल्या. दोघांनी २३ चेंडूत ४८ धावांची नाबाद भागीदारी केली. यामुळे विजयासह पाकिस्तानचा संघ पुन्हा गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अरे, हे काय झालं? शोएब मलिकला अडवता आला नाही साधा चेंडू, गप्टिलला फुकटात दिल्या ४ धावा

कमी पण तितकेच समर्पक शब्द, मोहम्मद शमीवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं

पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनचे खास ‘अर्धशतक’; धोनी, मॉर्गनच्या क्लबमध्ये समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---