---Advertisement---

भर सामन्यात अश्विनकडून घडली चूक, संतापलेल्या साउदीची थेट पंचांकडे तक्रार; पाहा घडलेला प्रकार

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 7:07 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटीचा दोन दिवसांचा खेळ संपला. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टिम साउदीने जबरदस्तत गोलंदाजीचे प्रदर्शन केले. सामन्यादरम्यान भारताच फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. साउदीने अश्विनविषयी पंचांकडे तक्रार देखील केली.

ही घटना भारताच्या डावाच्या ९३ व्या षटकात घडली. या षटकात टिम साउदी गोलंदाजी करत होता. यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाची विकेट पडल्यानंतर अश्विन फलंदाजीसाठी आला होता. अश्विनने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत त्याचे खाते खोलले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने शॉट मारला आणि एक धाव घेण्यासाठी पुढे आला. पण नॉन स्ट्राइकला उभा असेलेल्या श्रेयस अय्यरने त्याला माघारी पाठवले. यादरम्यान तो घाईत असल्यामुळे चुकून तो खेळपट्टीवरून धावला.

अश्विन माघारी पळाल्यानंतर ओव्हर थ्रो झाला आणि संघाला एक धाव मिळाली. यादरम्यान अश्विन खेळपट्टीवरून धावल्यामुळे साउदी नाराज झाला होता आणि त्याने पंच विरेंद्र शर्मांकडे या गोष्टीची तक्रार देखील केली. यानंतर पंचांनी अश्विनला याबाबत समज दिला आणि पुन्हा असे करू नको, असे सांगितले. यादरम्यान अश्विन आणि साउदी यांच्यात शाब्दीक बाचाबाची देखील झाल्याचे पाहायला मिळाले.  यानंतर अश्विनने साउदीच्या पुढच्याच षटकात सलग दोन चौकार मारले.

अश्विन आणि साउदीमध्ये यापूर्वी अशाप्रकारचा संघर्ष पाहिला गेला आहे. यावर्षी आयपीएल २०२१ च्या हंगामात देखील या दोघांमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विन अशाच प्रकारे एक अधिक धाव घेण्यासाठी धावला होता, ज्यामुळे साउदी नाराज झाला होता.

दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साउदीने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने भारताच्या पहिल्या डावात एकून पाच विकेट्स घेतल्या, ज्यापैकी चेतेश्वर पुजाराची विकेट त्याने पहिल्या दिवशी घेतला आणि रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांचे विकेट्स त्याने दुसऱ्या दिवशी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या-

लय भारी! ज्याने आपली जागा घेत कानपूर कसोटीत शतक ठोकले, त्याचीच विराटने थोपटली पाठ

VIDEO: ‘शतकवीर’ श्रेयसने मैदानाबाहेर जाताना केले असे काही, संघाकडून मिळाले मोठे स्टँडिंग ओव्हेशन

‘टी२० विश्वचषकातील सामन्यापूर्वीच पाकिस्तानला घाबरलेले भारतीय खेळाडू’, माजी क्रिकेटर बरळला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---