भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. अय्यरने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. श्रेयस अय्यरच्या शतकामुळे भारतीय संघ पहिला डाव संपल्यानंतर मजबूत स्थितीत पोहचला आहे. बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरचे सहकाऱ्यांनी खास स्वागतही केले आहे.
श्रेयस अय्यर १०५ धावा करून बाद झाला. त्याला टीम साऊथीने बाद केले. त्याच वेळी, जेव्हा तो बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जात होता, तेव्हा सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांनी स्टँडिंग ओव्हेशनद्वारे या युवा खेळाडूला प्रोत्साहन दिले. श्रेयस अय्यरला मिळालेल्या स्टँडिंग ओव्हेशनचे रूपांतर दीर्घकाळ चाललेल्या स्टँडिंग ओव्हेशनमध्ये झाले आहे.
श्रेयस अय्यरला त्याच्या पहिल्या कसोटी शतकासाठी दीर्घकाळ स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आणि याचे कारण स्वतः श्रेयस ठरला. श्रेयस अय्यरने ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करण्यापूर्वी सीमारेषेजवळ त्याचे हेल्मेट आणि ग्लोव्ज काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयस अय्यर ड्रेसिंग रूममध्ये जाईपर्यंत त्याच्या सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या.
Only deserved that Shreyas Iyer chose to shed off his helmet and gloves before entering the dressing-room, meaning it was a rather lengthy standing ovation from his teammates for his maiden Test ton #IndvNZ pic.twitter.com/IVaJQ5TaoB
— Bharat Sundaresan (@beastieboy07) November 26, 2021
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1464093629102768129?s=20
दरम्यान भारतीय संघाचा पहिला डाव ३४५ धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरने १७१ चेंडूत १०५ धावा केल्या. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा सोळावा क्रिकेटपटू ठरला. या यादीत लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत. अय्यर व्यतिरिक्त शुभमन गिलने ५२ आणि रवींद्र जडेजाने ५० धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने ३५ धावा केल्या तर उपकर्णधार चेतेश्वर पुजाराने २६ धावा केल्या. अश्विनने ३८ धावांची खेळी केली तर वृद्धीमान साहा फक्त १ धाव करू शकला. उमेश यादव १० धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडसाठी टीम साऊथी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ६९ धावांत ५ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या-
“पुढील कसोटीत श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता कमी”; लक्ष्मणने केले भाकित