न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीनं शनिवारी आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली. साऊदी आणि गेल यांनी आता कसोटी क्रिकेटमध्ये समान षटकार (98) मारले आहेत. फक्त ॲडम गिलख्रिस्ट (100), ब्रेंडन मॅक्युलम (107) आणि बेन स्टोक्स (133) त्यांच्या पुढे आहेत.
साऊदी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी संघाच्या 272/8 धावा झाल्या असताना क्रिजवर आता. त्याच्या अखेरच्या कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. साऊदीनं पुढच्याच षटकात स्टोक्सविरुद्ध मिड-विकेट आणि डीप स्क्वेअर-लेगवर दोन मोठे षटकार ठोकले. आपला स्फोटक फॉर्म कायम ठेवत त्यानं गस ॲटकिन्सनच्या पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिडविकेटवर षटकार खेचला आणि पुढचा चेंडू पॉइंट बाऊंड्रीकडे पाठवला.
अखेर ॲटकिन्सननं साऊदीला ब्रेडन कार्सनंच्या हाती झेलबाद केलं. साऊदी 10 चेंडूत 230 च्या स्ट्राइक रेटसह 23 धावा करून बाद झाला. ही न्यूझीलंडच्या फलंदाजानं 10 चेंडूंचा सामना केल्यानंतर खेळलेली तिसरी सर्वात वेगवान खेळी होती. या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावरही टीम साऊदीचं नाव आहे, ज्यानं 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 10 चेंडूत नाबाद 24 धावा ठोकल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस 97 षटकारांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. साऊदीची ही कामगिरी आणखी खास यामुळे बनते, कारण त्यानं कधीही पहिल्या सातमध्ये फलंदाजी केली नाही. याशिवाय त्यानं चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावले आहेत.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी 315/9 धावा केल्या. मिचेल सँटनरनं नाबाद 50 धावा केल्या, तर विल ओ’रुर्के खातं उघडू शकला नाही. कर्णधार टॉम लॅथमनं 63, तर विल यंग आणि केन विल्यमसन यांनी अनुक्रमे 42 आणि 44 धावा केल्या. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्स आणि गस ॲटकिन्सननं प्रत्येकी तीन, तर ब्रेडन कार्सनं दोन गडी बाद केले.
हेही वाचा –
गाबा कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया, चाहत्यांना खूश करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय!
असं कोण आऊट होतं भाऊ! केन विल्यमसननं मारली स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड, VIDEO व्हायरल
IND vs AUS; गाबा कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे बिघडणार? जाणून घ्या हवामान अंदाज