न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउदी रविवारी (1 ऑक्टोबर) भारतात दाखल झाला आहे. आगामी वनडे विश्वचषकात खेळण्याच्या हेतूने त्याने भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात साउदीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतरी विश्चषकात खेळणे त्याच्या कारकिर्दीला धोक्यात टाकण्यासारखे असेल.
इंग्लंड आणि न्यूझींलड यांच्यात सप्टेंबर 2023 मध्ये वनडे मालिका पार पाडली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी याला या मालिकेदरम्यान, श्रेत्ररक्षण करताना दुखापत झाली. तपासनीनंतर त्याच्या अंगठा तुटल्याचे समोर आले. या दुखापतीनंतरत 34 वर्षीय साउदीच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया पार पाडली. साउदीने दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या अंगठ्यामध्ये स्क्रू आणि प्लेट बसवली गेली आहे. असे असले तरी, वेगवान गोलंदाज विश्चषकादरम्यान, खेळण्याचा विचार करत आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात गुरुवारी (5 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ आमने सामने असणार आहेत.
तत्पूर्वी बुधवारी साउदीने माध्यमांसमोर म्हटले की, “ज्याठिकाणी प्लेट आहे, तेथिल भाग थोडा नाजूक आहे. पण याची सवय होऊन जाईल. मी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या काही आठवड्यांपासून जास्त गोलंदाजी केली नाहीये. वर्कलोड आणि अंगठ्याकडेही थोटे लक्ष द्यावे लागेल.”
दरम्यान, साउदी शस्त्रक्रियेनंतर अद्याप पूर्णपणे फिट झाला नाहीये. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याला यातून सावरण्यासाठी अजून बराच वेळ जाऊ शकतो. पण अशातही त्याने विश्वचषकात खेळण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या क्रिकेट कारकीर्द पणाला लागू शकते. न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साउदीचे योगदान महत्वाचे राहिले आहे. यावर्षी विश्वचषकात देखील तो संघासाठी मॅच विनरच्या भूमिकेत असू शकत होता. मात्र, शस्त्रक्रिया झालेल्या अंगठ्यावर दबाव दिल्याने त्याच्या अडचणीत वाढ येऊ शकते. अशात वेगवान गोलंदाज काय निर्णय घेणार, हे पाहण्यासारखे असेल. (Tim Southee gave important information about thumb injuries)
महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023 । स्पर्धेच्या एक दिवस आधी इंग्लंडची ताकद झाली कमी, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर!
World Cup 2023 । कर्णधारांच्या कार्यक्रमात रोहितचे मजेशीर उत्तर, बाबर आझमची प्रतिक्रियाही चर्चेत