---Advertisement---

न्यूझीलंडची साथ सोडलेल्या बोल्टबद्दल हे काय म्हणाला साथीदार साऊदी?

On: शुक्रवार, नोव्हेंबर 18, 2022 3:26 PM
New Zealand Cricket & Trent Boult
---Advertisement---

न्यूझीलंड व‌ भारत यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या मालिकेत न्यूझीलंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट संघात नाही. केंद्रीय करार न स्वीकारल्याने त्याला आता राष्ट्रीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. मागील जवळपास 15 वर्षापासून बोल्टसह न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणाऱ्या टीम साऊदीने बोल्टच्या अनुपस्थितीविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडसाठी मागील अनेक वर्षांपासून खेळणारा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात जागा बनवू शकला नाही.‌ नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात 8 बळी मिळवणाऱ्या बोल्टने ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंड बोर्डाचा केंद्रीय करार स्वीकारला नव्हता. त्या ऐवजी त्याने जगभरातील इतर लीग खेळण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे भविष्यात तो आणखी किती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार याबाबत मोठी शंका उपस्थित केली जातेय.

बोल्ट सध्या संघाचा भाग नाही याबाबत विचारले असता, संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदी म्हणाला,

“तो संघाचा एक प्रमुख भाग होता. तो सध्या संघात नाही ही गोष्ट खूप मोठी आहे. मात्र, त्याचवेळी तशाच आणखी एका प्रतिभावंत खेळाडूला संधी देखील मिळेल. एक उत्कृष्ट खेळाडू या स्तरावर येऊन आपला खेळ दाखवू शकतो. परंतु, ही खरंच दुर्दैवी गोष्ट आहे की, तुमचा एक सर्वोत्तम खेळाडू तुमच्या संघात नाही.”

टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट हे वयोगट क्रिकेटपासून एकत्र खेळत आहेत. 2008 अंडर नाईन्टीन विश्वचषकात त्यांनी पहिल्यांदा संघाचे एकत्रित प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर या जोडीने शानदार गोलंदाजी करत 2015 पासून न्यूझीलंडच्या प्रत्येक यशात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्याच नेतृत्वात न्यूझीलंडच्या गोलंदाजीने तीन विश्वचषकाच्या अंतिम फेरी तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप देखील जिंकवण्यात हातभार लावला होता.

(Tim Southee On Trent Boult Unavailability)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘मोठे ऑक्शन होणार आहे’, जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आकडेवारी! मालिकावीर केएल राहुल, सुपर ओव्हर्समध्ये इंडियाचा विजय आणि बरेचं काही 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---