आयपीएल २०२० च्या सत्रात आपल्या धारदार यॉर्कर चेंडूंनी दिग्गज फलंदाजांच्या त्रिफळा उडवणाऱ्या टी नटराजन याने सनराईजर्स हैद्राबादला अनेक सामने जिंकवून दिले होते. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली होती. खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याला एकवदिवसीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले आणि भारतीय संघाला विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. अशाप्रकारे तो एकाच दौऱ्यावर तीनही प्रकारात भारतीय संघासाठी पदार्पण करणारा पहिलाच क्रिकेटपटू बनला होता.
आता सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या २ कसोटी सामन्यातून त्याला बाहेर ठेवण्यात आले आहे. अशातच बीसीसीआयने टी नटराजन याच्यावर विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी नकार दिला आहे.
येत्या २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरुवात होत आहे. अशातच तामिळनाडू क्रिकेट संघाचा गोलंदाज टी नटराजन याला बीसीसीआयने खेळण्याची अनुमती नाही दिली आहे.
बीसीसआयने का केले टी नटराजन याला विजय हजारे ट्रॉफी बाहेर??
इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाला येत्या मार्च महिन्यात एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेत टी नटराजन संघासाठी गोलंदाजीमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो. यामुळेच खेळाडूंचे तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. याच कारणास्तव बीसीसीआयने टी नटराजनला विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची परवानगी नाही दिली आहे.
यावर तामिळनाडू क्रिकेट संघाचे सचिव आरएस रामासामी म्हणाले की, ” बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापक यांची मागणी आहे की, नटराजनने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त रहावे. भारतीय संघाच्या हितासाठी आम्ही हो बोललो आहे.”
तामिळनाडू संघात टी नटराजनच्या जागी जगनाथ श्रीनिवासला संधी देण्यात आली आहे. तामिळनाडू संघ १३ फेब्रुवारी रोजी इंदोरकडे रवाना होणार आहे.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
भारत आणि इंग्लंड यांच्यात २३ मार्च पासून एकदिवसीय एकदिवसीय मालिकेला सुरुवात
सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना १२ मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. ही ५ टी२० सामन्यांची मालिकाच अहमदाबादला होणार आहे. त्यानंतर २३ मार्च ते २८ मार्च दरम्यान वनडे मालिका महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियमवर होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या विश्वविजयावर आधारित ‘८३’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, ‘या’ दिवशी होणार रिलीज
गंभीर आजारने ग्रस्त, मृत्यूशी दिली झुंज, आता गाजवतोय क्रिकेटचं मैदान; वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास
Video: ‘लाज नाही वाटत का, काय गाणं बनवलंय; माझी पोरं बोलायची बंद झालीत’, PSLचे गाणे पाहून भडकला शोएब